SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ योजनेतील लाभार्थींची यादी जाहीर, मोदी सरकारकडून गिफ्ट..!!

पंतप्रधान आवास योजना.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना.. देशातील प्रत्येकाचं हक्काचं घर व्हावे, यासाठी मोदी सरकारने 1 एप्रिल 2016 पासून ही योजना सुरु केली. पीएम आवास योजनेअंतर्गत 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण (PM Aawas Yojana) अंतर्गत 2.95 कोटी घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यातील 1.73 कोटी घरे पूर्ण झाली आहेत. या ग्रामीण गृहनिर्माण योजनेतून लाभार्थ्यांना हप्त्या-हप्त्याने घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते..

Advertisement

पीएम आवास योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे.. पीएम आवास योजना-(ग्रामीण)- 2022-23 अंतर्गत लाभार्थ्यांची नवीन यादी प्रसिद्ध झाली आहे. तुमचं नाव या यादीत आहे की नाही, हे तुम्हाला घरबसल्या तपासता येणार आहे.. त्यासाठी खालील टिप्स फाॅलो करा..

असे पाहा यादीत नाव..

Advertisement
  • सर्वप्रथम पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा..
  • वेबसाईटवरील मुख्यपृष्ठावर सर्वात वर तुम्हाला ‘Awaassoft’ टॅबवर क्लिक करा.
  • नंतर निवास टॅबवर क्लिक करा, नंतर ‘रिपोर्ट’वर क्लिक करा.
  • आता एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केलं जाईल.
  • आता ‘सत्यापनासाठी लाभार्थी तपशील’ फॉर्मवर क्लिक करा.
  • नंतर तुमचे राज्य, पंचायत, उपविभाग तपशील, वर्ष निवडा, कॅप्चा कोड भरा व सबमिट करा.
  • आता तुमच्या समोर संपूर्ण यादी येईल, त्यात तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.

पीएम आवास योजनेअंतर्गत गरजू कुंटुंबाला निवासाची सोय करुन दिली जाते.. त्यासाठी लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेद्वारे प्रमाणित केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. यादीत तुमचे नाव आल्यानंतर ग्रामसभेद्वारे ते अंतिम केलं जाते.

शिवाय, ‘एमआयएस-आवास सॉफ्ट’ आणि ‘आवास’ अ‍ॅपद्वारेही तुम्हाला या याेजनेसाठी अर्ज करता येतो, यादीत तुमचं नाव आलंय की नाही, हे तपासता येत असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement