SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर..! मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे पेट्रोल आणखी स्वस्त होणार..?

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे.. येत्या काळात लवकरच पेट्रोलचे दर आणखी कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. इंधन दरवाढीमुळे नागरिकांमध्ये वाढत असणारी नाराजी लक्षात घेऊन मोदी सरकार हे दर कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे..

इंधनाचे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोलला (Petrol) प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता 12 ते 15 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर (Ethanol Blended Petrol) उत्पादन शुल्क (Excise Duty) भरावे लागणार नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचनाही जारी केली आहे.

Advertisement

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर कर नाही

मोदी सरकारच्या निर्णयानुसार, ज्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 12 ते 15 टक्क्यांपर्यंत असल्यास, या मिश्रित इथेनॉलला उत्पादन शुल्कातून सूट दिली जाणार आहे. परिणामी, पेट्राेल स्वस्त होणार आहे.. इथेनॉल मिश्रीत पेट्रोलच्या वापरास मागणी वाढावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोलवर नव्हे, तर त्यात मिसळल्या जाणाऱ्या 12-15 टक्के इथेनॉलवर ‘एक्साईज ड्युटी’ घेतली जाणार नाही.

Advertisement

समजा, 100 लिटर पेट्रोलमध्ये 12 टक्के म्हणजे 12 लिटर इथेनॉल मिसळल्यास त्यावर उत्पादन शुल्क भरावे लागणार नाही. म्हणजेच, फक्त 12 लिटर पेट्रोलवर उत्पादन शुल्क भरावे लागणार नाही. उर्वरित 88 टक्के, म्हणजेच 88 लिटर पेट्रोलवर पूर्वीप्रमाणेच उत्पादन शुल्क भरावे लागणार आहे.

पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रण केल्याने भारताला परकीय चलनात सुमारे 41,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना, हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. 2025-26 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनाॅलचे प्रमाण 20 टक्क्यापर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे समजते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement