SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पावसाबाबत हवामान विभागाकडून आनंदाची बातमी, ‘या’ भागात होणार मुसळधार..!

महाराष्ट्रात 7 जूनला माॅन्सूनचे आगमन झाले.. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली.. महिना होत आला, तरी पाऊस रुसलेला असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.. पेरण्या रखडल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे..

गेल्या महिनाभरापासून कोकण वगळता राज्यात पावसाने (Maharashtra rain update) दडी मारली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.. दक्षिण कोकणात कालपासून (ता. 4) मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील घाट माथ्यांवर जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Advertisement

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. 4) मध्यरात्रीनंतर मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा, विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ऑरेंज अलर्ट 

Advertisement
  • कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • विदर्भ : चंद्रपूर

यलो अलर्ट

  • कोकण : ठाणे, मुंबई, पालघर. मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर.
  • मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.
  • विदर्भ : अमरावती, यवतमाळ, नागपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

Advertisement
  • मराठवाडा : बीड, लातूर, उस्मानाबाद
  • विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी व राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चिपळूण, रत्नागिरीमध्ये अतिवृष्टी झाल्याने तेथे ‘एनडीआरएफ’च्या (NDRF) 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रायगड परिसराला ‘ऑरेंज अलर्ट’ दिल्याने, तेथेही ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या नेमल्या आहेत.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement