SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयकर भरताना ‘या’ गोष्टी लपवताय? मग येईल आयकर विभागाची नोटीस..

देशातील लोक नोकरी असो की व्यवसाय ठराविक मर्यादेपलीकडे उत्पन्न गेलं की आयटीआर भरावा लागतो. आता हा आयकर रिटर्न (Income Tax Returns) तुम्हाला भरायचा असेल तर तो भरण्याची मुदत 31 जुलै 2022 पर्यंत आहे. यासोबतच यंदा नवीन आयटीआर फाईल फॉर्मच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता तुम्ही कर भरताना ही माहिती लपवू शकणार नाही. तसेच, रिटर्न भरताना तुम्हाला कोणतीही अडचण न येण्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे.

कोणती नवीन माहिती द्यावी लागणार..?

Advertisement

रिपोर्टनुसार, पेन्शनधारकांसाठी आयटीआर फॉर्ममध्ये पेन्शनधारकांना पेन्शनच्या सोर्सची माहिती द्यावी लागेल. आता येथे समजून घ्या की, आपण जर केंद्र सरकारचे पेन्शनधारक असाल तर आणि राज्य सरकारचे निवृत्तीवेतनधारक असाल तर त्या प्रकाराप्रमाणे तुम्हाला पेन्शन कुठून येते याची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रामधील कंपनीकडून पेन्शन मिळत असेल किंवा इतर कंपन्यांकडून पेंशन मिळत असेल तरीही ती माहिती द्यावी लागणार आहे.

नोकरी करताना EPF मध्ये योगदान केलं जातं, जर हे योगदान एका वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अतिरिक्त योगदानावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल, तुम्हाला या व्याजाबद्दल ITR फॉर्ममध्ये सांगावे लागणार आहे. जर तुम्ही ही माहिती खोटी दिली किंवा माहितीच दिली नाही तर तुम्हाला आयकर विभाग नोटीस पाठवू शकते.

Advertisement

आयटीआर फाइल सबमिट करताना तुम्ही घर किंवा जमीन खरेदी केली असेल, तर तुम्हाला ही माहिती द्यावी लागेल. आयटीआर फॉर्ममध्ये, तुम्हाला कॅपिटल गेन्समध्ये खरेदी किंवा विक्रीची तारीख द्यावी लागेल. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या एका आर्थिक वर्षांमध्ये तुम्ही कोणतीही जमीन खरेदी-विक्री केली असेल, तर त्या वर्षाच्या या व्यवहाराची तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही तुमच्या घराचे नूतनीकरण केले किंवा जमीन घेतली तर या खर्चाची माहिती द्यावी लागेल. दीर्घकालीन भांडवली नफा मिळवण्यासाठी हा खर्च विक्री किंमतीतून वजा करावा लागतो. जेव्हा तुम्ही आयटीआर दाखल करता तेव्हा ही माहिती देणे आवश्यक आहे.

Advertisement

आतापर्यंत फक्त इंडेक्स कॉस्ट नमूद करावी लागत होती, पण आता तुम्हाला इंडेक्स कॉस्ट सोबत मूळ किंमत द्यावी लागेल. आयकर विभागाने आता आयटीआर फॉर्म जारी करताना हे सर्व नवीन नियमदेखील सांगितले होते. प्राप्तिकर विभाग नियम कडक करत आहे, म्हणजेच कर चुकवेगिरी थांबली पाहिजे.

जर तुम्ही ITR-2 किंवा ITR-3 फॉर्म भरत असाल, तर तुम्हाला तुमचा रेसिडेन्शियल स्टेटस द्यावा लागेल. म्हणजेच तुम्ही भारतात किती दिवस राहणार आहात हे सांगावं लागणार आहे. जर तुमची परदेशी मालमत्ता आणि कमाई जर परदेशात मालमत्ता असेल किंवा परदेशातील कोणत्याही मालमत्तेवर लाभांश किंवा व्याज मिळाले असेल, तर त्याची माहिती देणे गरजेचे आहे. ITR फॉर्म-2 आणि ITR फॉर्म-3 वापरा. जर तुम्ही देखील ITR भरणार असाल आणि तुमची विदेशात काही मालमत्ता असेल किंवा देशाबाहेर कोणती मालमत्ता विकली जात असेल तर ही माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement