SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गडकरींची मोठी घोषणा; आता इलेक्ट्रिक कार, स्कुटरच्या किंमतींमध्ये ‘असा’ होणार बदल

नवी दिल्ली :

मागच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. यानंतर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी ऍक्शन मोडमध्ये आले. त्यांनी आपल्या खात्यामार्फत थेट चौकशीचे आदेश दिले आणि कंपन्यांना उत्तर देण्यास सांगितलं. आता त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत ही पेट्रोल कारच्या किंमतीएवढी असणार आहे.

Advertisement

ही बातमी इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी घेणाऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी आहे. तंत्रज्ञान आणि हरित इंधनांमधील जलद प्रगतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती आगामी काळात कमी होतील असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर काम होणार असून इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती पट्रोल गाड्यांच्या किंमती एवढया होणार आहेत. आगामी काळात देशात निश्चितपणे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात क्रांती घडवून येईल हे मात्र नक्की आहे.

नितीन गडकरी यांनी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2022-2023 च्या अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना म्हटलं आहे की, इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी होईल. फक्त इलेक्ट्रिक वाहनेच नाही तर आम्ही स्वदेशी इंधनावर देखील काम करत आहोत.

Advertisement

सध्या स्वदेशी इंधन हे देशाची गरज असून आगामी काळात निश्चित यामध्ये देखील मोठा बदल घडून येणार आहे. गडकरींनी यावेळी खासदारांना सल्ला दिला आहे की हायड्रोजन तंत्राचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. आपापल्या भागातील सांडपाण्याचे पाणी ग्रीन हायड्रोजनमध्ये बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा. हायड्रोजन हा लवकरच सर्वात स्वस्त इंधन पर्याय असेल असं देखील गडकरींनी यावेळी स्पष्ट केलं.

Advertisement