कुटुंब आणि नोकरी या दोन्ही गोष्टी सांभाळत घराची आणि देशाची अशा दोन्ही जबाबदाऱ्या पाळत येणारी संकटं पार करताना दाखवलेला ‘फॅमिली मॅन’ म्हणजे बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता मनोज वाजपेयी. मागील काही दशकांपासून लोकांच्या मनावर राज्य गाजवणारा हा अभिनेता हल्ली वेबसिरीजद्वारे अगदी घराघरांत पोहोचला आहे.
अभिनेता मनोज वाजपेयीची सुरुवातीला ‘द फॅमिली मॅन’ ही वेबसीरिज आल्यानंतर तिला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आणि ही सीरिज तुफान गाजली होती. यामुळेच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला यायचं ठरवत नाते ‘द फॅमिली मॅन-2’ म्हणजेच दुसरा सीझन आला आणि सगळीकडे हे नाव गजबजलं आहे. आता प्रेक्षकांना पुढील सीझन कधी येणार आहे याची उत्सुकता लागली आहे. आता ही उत्सुकता थांबवा. कारण तुम्हाला ‘द फॅमिली मॅन-3’ (The Family Man-3) हा पुढील सीझन लवकरच पाहता येणार आहे.
कधी होणार रिलीज..
तुम्हाला सांगू इच्छितो की, ही वेबसीरिज देशातच नव्हे तर परदेशात देखील पाहिली जातेय. म्हणूनच निर्माते या वेबसिरीजचे सीझन रिलीज करण्यात विशेष रस दाखवत आहेत. आनंदाची बातमी अशी की, या वर्षाच्या शेवटी ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
येत्या नोव्हेंबरमध्ये महिन्यांमध्ये Family Man-3 Webseries ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिरीजला एक वेगळा असा चाहता वर्ग आहे, ही खास गोष्ट आहे. ‘द फॅमिली मॅन’ च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना थरार नाट्य अनुभवायला मिळणार आहे. राज निदिमोरू, कृष्णा डी.के आणि सुमन कुमारने या सीरिजच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर मनोज वायपेयी (Manoj Bajpayee), प्रियामणी, शारीब हाशमी आणि श्रेया धनवंतरी या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy