SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर ! स्मार्टफोनचा वापर करून भरगोस कमाई करा; ‘या’ फिटनेस Apps चा करा वापर

मुंबई :

सध्याच्या धकाधकीच्या या काळात स्मार्टफोन आणि इंटरनेट सगळ्यांचा आधार बनले आहे. ऑफिसच्या कामापासून तर मुलांच्या शिक्षणापर्यंत आता सगळं काही ऑनलाईन शक्य आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून युजर्सला घरबसल्या पैसे कमावणे अत्यंत सोपे झाले आहे. घरबसल्या पैसे कमावण्याच्या Apps मध्ये फिटनेसपासून मार्निंग वॉकपर्यंतच्या कामांसाठी युजर्सला पैसे देण्यात येतात. अशा काही अँप्सच्या माध्यमातून पैसे कमवणे शक्य आहे. Paid To Go हे एक Run Tracker App आहे, ज्यावर केवळ चालण्यासाठी पैसे देण्यात येतात.

Advertisement

हे App वापरल्यानंतर युजरला बिटकॉइनच्या माध्यमातून पेमेंट केले जाते. या App चा फायदा युजर्सला चांगली कमाई करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. Grofitter हे देखील एक फिटनेस App आहे. युजर्सला आपला फिटनेस मेंटेन करण्यासाठी हे App पैसे देते. त्यासाठी युजरला यात झुम्बा, सायकलिंग आणि वॉकिंग करणारे विविध पर्याय App मध्ये दिले आहेत. Yodo हे देखील एक फिटनेस ट्रॅकर App आहे. या App चा वापर करून वॉकिंग, रनिंग आणि Hiking करण्यासाठी युजर्सला पैसे देण्यात येतात.

Stepbook हे फिटनेसशी संबंधित एक Mobile App आहे, ज्यामध्ये युजर्सच्या स्टेप्स ट्रॅक करून त्याला Stepbucks मध्ये कन्व्हर्ट करण्यात येतं आणि त्याद्वारे पैसे देण्यात येतात. Rantopia हे एक जिपीएस(GPS) वर चालणारं App आहे. या App चा वापर करून युजरला त्याच्या फिटनेस स्टेप्सला ट्रॅक आणि Analyze करता येतात.

Advertisement

युजर्सला स्टेप्स किती झाल्या यावर SPC कॉइन्सच्या रुपात पैसे मिळू शकतात. Step Set Go हे एक मोबाइल फिटनेस रिवार्ड प्लॅटफॉर्म आहे. या अँपचा वापर करून युजरला आपल्या स्टेप्सला क्रेडिटमध्ये बदलता येऊ शकतं. त्याचबरोबर (money earning apps in India) त्यावर देण्यात येणाऱ्या लाइफस्टाइल रिवार्ड्सलाही रिडिम करता येते.

Advertisement