SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी, अकरावी प्रवेश प्रक्रिया ‘या’ कारणामुळे रखडली..!

दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. राज्य शिक्षण मंडळाने गेल्या 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर केला.. मात्र, अजूनही राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही, त्यामुळे विद्यार्थी-पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.. त्यानंतर आता अकरावी प्रवेशाबाबत महत्वाची माहिती समोर आलीय..

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असला, तरी अजून ‘सीबीएसई’ बोर्डाचा निकाल जाहीर झालेला नाही.. काही दिवसांपूर्वीच ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, नंतर पुन्हा एकदा हा निकाल लांबणीवर गेल्याचे समजते..

Advertisement

खरं तर दरवर्षी ‘सीबीएसई’ बाेर्डाचा दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाच्या आधी, म्हणजे मे महिन्यातच जाहीर हाेत असताे. मात्र, यंदा राज्य शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला, तरी अन्य शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झालेले नाहीत.

‘सीबीएसई’ निकालामुळे वेटिंग..

Advertisement

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावीच्या एकूण प्रवेशांपैकी 5 टक्के जागा ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया थांबवली आहे.. ‘सीबीएसई’ बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग येणार आहे.

दरम्यान, अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने मे महिन्यातच अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास सांगितले होते. त्यानुसार पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण, नाशिक, अमरावती, नागपूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरला. मात्र, या भागात प्रवेशाचा पुढील टप्पा अजून सुरू झालेला नाही.

Advertisement

दुसरीकडे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लागू नसलेल्या ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश सुरू आहेत. ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक, प्रवेश फेरी जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे काढून ठेवण्याचे आवाहन करण्यात आलंय. अकरावी प्रवेशासाठी ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement