SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गॅस सिलिंडरवरचे अनुदान कायमचे बंद होणार?

जर तुम्ही घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी असू शकते. कारण केंद्र सरकार सबसिडीबाबत ग्राहकांना मोठी बातमी देऊ शकते. त्याचबरोबर सरकारनं एलपीजी सिलिंडरवरील अनुदानाबाबत (LPG Gas Cylinder Subsidy News) एक नवीन योजना तयार करत असल्याचं सांगण्यात येतंय.

सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपयांपेक्षा जास्त आहे. एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किंमतीमुळे सरकार योजना तयार करणार असल्याचं समजतंय. त्यानुसार सांगायचं झालं तर सरकार असे काही करू शकते की, ग्राहकांना एका सिलिंडरसाठी 1000 रुपयांपर्यंतच पैसे मोजता यावेत. पण यामुळे अनुदानाविषयी देखील सरकार निर्णय घेऊ शकते.

Advertisement

रिपोर्टनुसार, केंद्र सरकार आता एलपीजी सिलिंडरबाबत सरकार दोन भूमिका घेऊ शकते. एक म्हणजे सरकारने अनुदानाशिवाय सिलिंडरचा पुरवठा करू शकते किंवा सरकार अशा ग्राहकांना अनुदानाचा लाभ देऊ शकते, ज्यांना काही उत्पन्न विषयक नियम लावू शकेल. सध्या जरी अनेक ठिकाणी कोरोनानंतर पुन्हा अनुदानाचा लाभ मिळत असला तरी सिलिंडरची किंमत काही मर्यादेपर्यंत ठेऊन अनुदानाचा लाभ सर्वच ग्राहकांना देण्याचं काम सरकार थांबवू शकते.

घरगुती गॅस सिलिंडर देण्यासंबंधी सरकारकडून अद्याप कसलीही अधिकृत माहीती आलेली नसली, तरी आतापर्यंत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ज्या नागरिकांचे अथवा कुटुंबाचे उत्पन्न 10 लाख रुपयांपर्यंत त्यांना उत्पन्नाचा नियम लागू करू शकते व उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळणं चालू राहू शकतं. यानुसार इतर सर्व नागरीकांना मिळणारे अनुदान हे संपुष्टात येऊ शकते, अशी माहीती आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोना महामारीच्या काळात कच्च्या तेल आणि वायूच्या किमती सातत्याने वाढल्यानंतर आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर बंद असलेलं अनुदान काही दिवसांनंतर पुन्हा मिळू लागलं आणि प्रत्यक्षात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2021 पासून गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आता गॅसच्या किंमती वाढू शकतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement