SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताला मिळाली नवी ‘ब्यूटी क्विन’.., ‘या’ सौंदर्यवतीने जिंकला ‘मिस इंडिया’चा खिताब..

भारताला पुन्हा एकदा नवी ‘ब्युटी क्विन’ मिळालीय.. ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड-2022’ विजेतीची रविवारी (3 जुलै) रात्री उशिरा घोषणा करण्यात आली. त्यात कर्नाटकच्या सिनी शेट्टी हिने यंदाचा ‘मिस इंडिया’चा खिताब जिंकला.. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये सिनी शेट्टीच्या डोक्यावर मानाचा मुकूट घातला गेला.

देशभरातील फायनालिस्ट 31 सौंदर्यवतींना मागे टाकत 21 वर्षीय सिनी शेट्टी हिने ‘मिस इंडिया’चा खिताब जिंकला. राजस्थानची रुबल शेखावत ही पहिली उपविजेती, तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी उपविजेती ठरली. ‘टॉप-5’मध्ये सिनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, प्रज्ञा अय्यागरी व गार्गी यांचा समावेश होता. त्यात सिनीने बाजी मारली.

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

Advertisement

‘फेमिना मिस इंडिया-2021’ ठरलेली मनसा वाराणसी हिने ‘मिस इंडिया-2022’चा ताज सिनीच्या डोक्यावर चढवला.. यंदाचा मिस इंडिया खिताब जिंकणारी सिनी शेट्टी कोण, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

सिनी शेट्टीबाबत….

Advertisement

सिनी शेट्टीचा जन्म मुंबईचाच.., पण ती मूळची कर्नाटकची आहे. ‘अकाउंटिंग आणि फायनान्स’मध्ये तिने बॅचलर डिग्री घेतलीय. तसेच आता ती ‘सीएफए’ (चार्टर्ड फायनान्स अ‍ॅनालिस्ट) अभ्यासक्रमाचेही शिक्षण घेतेय. अभ्यासात हुशार असलेल्या सिनीला नृत्याची प्रचंड आवड आहे..

वयाच्या चौथ्या वर्षीच तिने नृत्याला सुरुवात केली. चौदाव्या वर्षांपर्यंत ती अरंगत्रम व भरतनाट्यममध्ये पारंगत झाली होती.. मॉडेल म्हणून तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती.. आतापर्यंत ती अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे.

Advertisement

‘फेमिना मिस इंडिया-2022’चा धमाकेदार शो रविवारी (ता. 3) संध्याकाळी झाला.. त्यात फॅशन डिझायनर अभिषेक शर्मा याच्या रिसॉर्ट वेअर कलेक्शननं डिझाईन केलेले कपडे या सर्व सौंदर्यवतींनी परिधान केले होते. ‘मिस इंडिया-2022’चा ग्रॅंड फिनाले ‘कलर्स’ वाहिनीवर 17 जुलै रोजी पाहता येणार आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement