SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सावधान..! आक्षेपार्ह ‘पोस्ट’ टाकल्यास आता खैर नाही, मोदी सरकार आणतेय ‘असा’ कायदा…!!

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियातून द्वेषपूर्ण मजकूर पसरवला जात असल्याचं सातत्याने दिसून आलेय.. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.. अशा पोस्ट केल्याप्रकरणी काही जणांना जेलवारीही करावी लागलीय.. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला जावा, यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे..

सोशल मीडियावरील द्वेषयुक्त पोस्ट रोखण्यासाठी केंद्र सरकारने द्वेषविरोधी कायदा आणण्याच्या विचारात आहे.. केवळ हिंसा पसरवणारा मजकूरच नव्हे, तर खोटे पसरवणारे, आक्रमक विचार मांडणारेही या कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहेत.

Advertisement

बऱ्याच दिवसांपासून या विषयावर केंद्र सरकार विचार करी होते. पण, आता या कायद्याचा मसुदा तयार केला जात आहे.. द्वेषपूर्ण भाषणाबाबत आता ‘स्केल’ ठरवले जाईल व त्यानुसार संबंधित व्यक्तीवर काय कारवाई करायची, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनातच या कायद्यावर संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

द्वेषमूलक भाषण, इतर देशांचे कायदे व अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश लक्षात घेऊन कायद्याचा मसुदा तयार केला जाणार आहे.. लवकरच जनमतासाठी तो मांडला जाईल. त्यात द्वेषयुक्त भाषणाची व्याख्या स्पष्ट होईल. लोकांना ते बोलतात किंवा लिहितात, हे कायद्याच्या कक्षेत येते की नाही, हे कळेल..

Advertisement

चुकीच्या पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई

हिंसा पसरवणाऱ्या भाषणे (हेट स्पीच), इंटरनेटवर ओळख लपवून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या व आक्षेपार्ह पोस्ट, भेदभाव व जातीय भाषाही द्वेषयुक्त भाषणाच्या कक्षेत ठेवली पाहिजे, असे विधी आयोगाने आपल्या ‘कन्सल्टेशन पेपर’मध्ये स्पष्ट केले.

Advertisement

केंद्र सरकारच्या या कायद्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीच्या पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग खुला होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे समोर आल्यानंतर आता त्यांच्याविरोधात कठोर कायदे केले जाणार असल्याचे सांगण्यात आले..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement