SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) मध्ये होणार बंपर भरती

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची((MPSC) भरती प्रक्रिया सुरु होणार असं बोललं जात होतं. नुकत्याच मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ग्रुप बी (Group B) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत 800 पदं भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्यास सुरुवात करावी. (MPSC) ग्रुप बी पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार mpsconline.gov.in संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग 800 गट B मधील SI/DR, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक(PSI) पदांसाठी अर्ज मागवत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत MPSC ग्रुप बी भरती अधिसूचना पाहून घ्यावी.

Advertisement

(MPSC) भरती प्रक्रियेसाठी अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदांशी संबंधित अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार mpsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना बारकाईने वाचून नंतर अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी सामान्य उमेदवाराला 394 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे तर आरक्षित वर्गातील उमेदवारा 294 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. MPSC ग्रुप बी पदांसाठी उमेदवारांची निवड परीक्षा – पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये क्रमाक्रमाने केली जाणार आहे.

Advertisement