SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतजमीन खरेदी करताना ही घ्या काळजी; अन्यथा…

जमीन खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. कोणत्या आहेत या 5 गोष्टी, याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

1. जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा नीट पाहणे :- ज्या गावात आपल्याला जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे तपासून घ्यावे.

Advertisement

2. भूधारणा पद्धत तपासून घेणे :-
एकदा का सातबारा उतारा हातात आला की, त्यावर जी जमीन खरेदी करायची आहे, ती कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, हे पाहावं. सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धतीची नोंद केलेली असते.

3. जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणे :-
ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं. यामुळे एकतर आपल्याला जमिनीची हद्द कळते. नकाशाप्रमाणे जमिनीची हद्द तपासून घ्यावी.

Advertisement

4. शेत रस्ता :-
जी जमीन खरेदी करायची आहे, तिथं जाण्यासाठी शेतरस्ता आहे की नाही, ते पाहावं.जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो. पण, जमीन बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.

5. खरेदी खत :-
तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे. यात गट नंबर, मूळ मालकाचं नाव, चतु:सीमा, क्षेत्र बरोबर आहे की नाही ते तपासून घ्यावं.

Advertisement