SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हाडांच्या दुखण्याने हैराण झालाय..? आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश…

हाडे मजबूत असतील, शरीर मजबूत राहते.. तरुणपणात सगळ्यांचीच हाडं मजबूत असतात, पण उतारवयात हाडांची झिज झालेली असते.. त्यातून सांधेदुखी, हाडे फ्रॅक्चर होणं, रिकेड्स कॅन्सर किंवा हाडांचं इन्फेक्शन सारखे आजार बळावतात..

हाडांच्या आजारांपासून दूर राहायचे असेल, तर वेळीच खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यायला हवं.. आहारात (Health Tips) नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

दूध : दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन-डी, फास्फरस, पोटॅशियम व मॅग्नेशियम आदी घटक असतात. त्यामुळं शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते.

Advertisement

हिरव्या पालेभाज्या : शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असायलाच हवा.. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नीज व व्हिटॅमिन-सी आदी घटकांमुळे हाडे मजबूत होतात.

पोमेलो : हे एक आंबट फळ आहे. मात्र, आपल्या आरोग्यासाठी, विशेषत: हाडांसाठी हे फळ फायदेशीर मानलं जातं. पोमेलोतून शरीराला ‘व्हिटॅमिन-सी’ मिळतं. त्यामुळे आहारात या फळाचाही समावेश असायला हवा.

Advertisement

सॅल्मन फिश : हाडांच्या मजबूतीसाठी शरीरात ‘ओमेगा -3 अॅसिड’ असणं आवश्यक असतं. त्यासाठी ‘सॅल्मन फिश’ हे फॅटी अॅसिडचा एक उत्तम स्त्रोत आहे.

अंडी : अंड्यांमध्ये केवळ प्रोटीन्सच नसतात, तर त्यात ‘व्हिटॅमिन-डी’ असते. अंड्याच्या नियमित सेवनाने हाडांचे विकार दूर होतात.

Advertisement

ड्रायफ्रूट – हाडांच्या मजबुतीसाठी अक्रोड, काजू, बदाम, ब्राझील नट्स खायला हवेत. त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, अ‍ॅन्टिऑक्सिडंट, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, फॉस्फरस सारखे घटक असतात.

पालक – हाडं मजबूत ठेवण्यासाठी पालक देखील खाऊ शकता. पालकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडं चांगली राहतात.

Advertisement

नाचणी – नाचणीमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे हाडं मजबूत होऊन फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. उष्णता कमी करण्यासाठीही नाचणी उपयोगी आहे.

राजगिरा आणि तीळ – राजगिरा ऐमारैन्थ कॅल्शिअम आणि फॉस्फरस स्रोत आहे. तीळ कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशियमची आवश्यकता पूर्ण करतं.

Advertisement

टीप – वरील लेखातील माहिती सामान्या ज्ञानावर आधारित आहे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement