SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इलेक्ट्रिक वाहनांबाबत धक्कादायक अहवाल, ‘असा’ बसतोय फटका..!

गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर गगणाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांनी ‘सीएनजी’ किंवा इलेक्ट्रिक गाड्या घेण्यास सुरुवात केली होती.. शिवाय, या इलेक्ट्राॅनिक गाड्या पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली असल्याचंही बोललं जात होतं.. मात्र, आता या वाहनांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे..

एका अहवालानुसार, इलेक्ट्रिक गाड्या वाटतात, तितक्या पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली नसल्याचे समोर आले आहे. एका इलेक्ट्राॅनिक कारसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल जमिनीतून काढताना 4,275 किलो ॲसिड कचरा व किरणोत्सर्गी अवशेष तयार होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ही वाहने खरंच फायदेशीर आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय…

Advertisement

पर्यावरणासाठी 3 पट विषारी

जगातील सर्वांत हलका धातू म्हणजे, लिथियम.. हा धातू अगदी सहज ‘इलेक्ट्रॉन’ सोडतात. त्यामुळे हे लिथीयम ईलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरले जाते. लिथियमचा पर्यावरणपूरक म्हणून गौरव केला जातो; परंतु ते जमिनीतून काढणं पर्यावरणासाठी 3 पट जास्त विषारी असल्याचे सांगितले जाते..

Advertisement

ऑस्ट्रेलियातील संशोधनानुसार 3300 टन लिथियम कचऱ्यापैकी केवळ 2 टक्के पुनर्वापर होतो, तर त्यातून 98 टक्के प्रदूषण पसरते. इलेक्ट्रिक वाहनासाठी 13,500 लिटर पाणी लागते, तर पेट्रोलमध्ये जवळपास 4 हजार लिटर पाणी असते. कोळशावर चालणाऱ्या विजेवर इलेक्ट्रिक वाहन चार्ज करून दीड लाख किलोमीटर चालवल्यास पेट्रोल कारपेक्षा केवळ 20 टक्के कमी कार्बन निर्माण होतो.

आजघडीला जगात सुमारे 200 कोटी वाहने असली, तरी त्यात फक्त 1 कोटी इलेक्ट्रिक वाहने आहेत.. सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्यासाठी लागणारा कच्चा माल जमिनीतून काढल्यास, ॲसिड कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसी साधने नाहीत. सध्या भारतात चार्जिंग स्टेशन, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, सुरक्षेची काळजी, कमी पर्याय, ब्रँडची उपलब्धता, आदी समस्या आहेत.

Advertisement

असे असले, तरी 2030 पर्यंत भारतात 70 टक्के व्यावसायिक कार, 30 टक्के खासगी कार, 40 टक्के दुचाकी व 80 टक्के तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने करण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात आले..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement