SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अभिमानास्पद! भारताच्या DRDOनं केलं ‘या’ विनापायलट विमानाचं यशस्वी लँडिंग

नवी दिल्ली :

 

Advertisement

‘आत्मनिर्भर’ भारत या संकल्पनेच्या माध्यमातून भारतात आर्मी, नेव्ही, एरफोर्सस या तिन्ही शस्त्रदलांच्या लढाऊ वाहनांच्या आणि इतर काही गोष्टींची निर्मिती भारतातच केली जात आहे. DRDO (Defence Research and Development Organisation) म्हणजेच संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था. मानवरहित विमान निर्मितीमध्ये संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेला मोठे यश प्राप्त झाले आहे. डीआरडीओने स्वायत्त फ्लायिंग विंग टेकनॉलॉजि डेमॉन्स्ट्रेटर पहिले उड्डाण यशस्वीरित्या पार पाडले आहे.

हे उड्डाण कोणत्याही पायलटशिवाय झाले शिवाय टेकऑफ पासून ते लँडिंग पर्यंतची सर्व कामे कोणाच्याही मदतीशिवाय शक्य झाली आहेत. डीआरडीओने यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कर्नाटकमधील चित्रदुर्गतील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर शुक्रवारी हा सराव करण्यात आला होता. मानवरहित एरियल व्हेईकल(UAV) हे ‘ऑटोनॉमस फ्लायिंग विंग टेकनॉलॉजि डेमॉन्स्ट्रेटर’ म्हणूनही ओळखले जाते.

Advertisement

या विमानाबद्दल अधिक माहिती देताना संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे की, हे विमान पूर्णपणे स्वायत्त पद्धतीने चालवले जाणार असून टेस्ट केलेल्या विमानाने यशस्वी उड्डाणही केले आहे. यामध्ये टेकऑफ, वे पॉईंट नेव्हिगेशन यांचा समावेश करण्यात आला आहे. पायलट विरहित विमानाबाबतीत हे विमान मैलाचा दगड ठरणार आहे.

स्वावलंबनाच्या दिशेनेही हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. या विमानाबाबत एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, या मानवरहित विमानाने यशस्वी उड्डाण केले आहे. त्यासाठी लागणारा सरावही करण्यात आला आहे. या विमानाची निर्मिती धोरणात्मक पद्धतीने झाली असून, आत्मनिर्भरतेच्या बाबतीत हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे.

Advertisement