महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी धक्कादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम कंपन्यांकडून अचानक दरवाढ केली जात आहे. टेलिकॉम कंपन्या आपल्या प्लॅन्स किंमतीत एकदम बदल करीत असल्याने, नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.. जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडियानंतर ‘बीएसएनएल’नेही दरवाढ केली आहे.
भारत संचार निगम लिमिटेड.. अर्थात ‘बीएसएनएल’ने (BSNL) नुकतेच गुपचूप 3 नवीन प्री-पेड प्लॅन (Prepaid Plans) लाँच केले. कंपनीनं अनेक प्री-पेड प्लॅन्स एकाच वेळी महाग केल्याची माहिती ‘टेलिकॉम टॉक’कडून देण्यात आलीय.. ‘बीएसएनएल’कडून कोणत्या प्लॅन्समध्ये बदल करण्यात आलेत, ते जाणून घेऊ या..
99 रुपयांचा प्लॅन
‘बीएसएनएल’च्या 99 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये पूर्वी अमर्यादित कॉलिंगसह 22 दिवसांची वैधता मिळत होती. पण, आता या प्लॅनची वैधता 18 दिवसांची करण्यात आली आहे. ‘बीएसएनएल’कडून या प्लॅनची वैधता 4 दिवसांनी कमी करण्यात आलीय.. अर्थात, इतर सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत..
118 रुपयांचा प्लॅन
‘बीएसएनएल’च्या 118 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 500 MB डेटा, ‘अनलिमिटेड कॉलिंग’ मिळते.. मात्र, पूर्वीचा हा 26 दिवसांच्या हा प्लॅनची वैधता आता 20 दिवसांची झाली आहे. त्यामुळे या प्लॅनची किंमत सुमारे 4.53 रुपयांनी वाढल्याचे दिसते.
319 रुपयांचा प्लॅन
‘बीएसएनएल’चा 319 रुपयांचा प्लान पूर्वी 75 दिवसांचा होता. तो आता 65 दिवसांचा झालाय.. म्हणजेच आता हा प्लॅनही जवळपास 4.25 रुपयांनी महागलाय. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह रोज 300 एसएमएस व 10 जीबी डेटा मिळतो..
दोन नवे प्लॅन सादर
- ‘बीएसएनएल’ने दोन नवीन मासिक प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. ज्यांची किंमत 228 रुपये व 239 रुपये आहे. या प्लॅनची वैधता 1 महिन्याची आहे. 228 रुपयांच्या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, रोज 2GB डेटा व 100 एसएमएस मिळतील.
- तसेच, 239 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 10 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम, शिवाय रोज 2GB डेटा व दररोज 100 मोफत एसएमएस असे फायदेही मिळणार आहेत.