SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतात ट्विटर, व्हाट्सअपची मोठी कारवाई; ‘इतक्या’ लाख लोकांच्या खात्यांवर थेट बंदीचे आदेश

मुंबई :

ट्विटरने आपल्या मार्गदर्शकत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल मागील दोन महिन्यांमध्ये भारतीय वापरकर्त्यांच्या 46,000 हून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. ही माहिती मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने रविवारी त्यांच्या मंथली कंपाइलेंस रिपोर्ट सादर करताना दिली आहे. रिपोर्ट अनुसार ट्विटरने बाल लैंगिक शोषण, नॉन-कन्सेनच्युअल न्यूडिटी आणि इतर अशाच प्रकारच्या कंटेटसासाठी 43,656 खात्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच दहशतवादाला खतपाणी घालणारी 2,870 खाती देखील ट्विटरने बॅन केली आहेत.

Advertisement

ट्विटर प्लॅटफॉर्मला सोशल मीडियाच्या माध्यमातून 26 एप्रिल 2022 ते 25 मे 2022 दरम्यान भारतात 1,698 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारी ऑनलाइन गैरवर्तन/छळ (1,366), द्वेषपूर्ण वागणूक (111), चुकीची माहिती आणि मॅनिपुलेटेड मीडिया (36), संवेदनशील अडल्ट कंटेंट (28), फसवेगिरी (25) अशा संबंधित होत्या.

या तक्रारींचा आढावा घेऊन ट्विटरने 1,621 युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (URLs) विरुद्ध देखील कारवाई केली. यामध्ये ऑनलाइन छळ (1,077), द्वेषपूर्ण वर्तन (362) आणि संवेदनशील अडल्ट कंटेंट (154) संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्‍या URL चा समावेश होता.

Advertisement

ट्विटरने खाते निलंबनाची विनंती करणाऱ्या 115 तक्रारींवरही कारवाई केली आहे. रविवारी प्रसिध्द झालेल्या मंथली ट्रांसपेरेंसी रिपोर्टनुसार Google India ने बाल लैंगिक शोषण आणि हिंसक अतिरेकी कंटेंट यासारख्या हानिकारक कंटेंटचा प्रसार रोखण्यासाठी कारवाईचे आदेश दिले होते. या संदर्भात ऑटोमेटेड डिटेक्शनच्या मदतीने मे महिन्यात 393,303 हानिकारक कंटेंटवर कारवाई करत असा कंटेंट काढून टाकण्यात आला आहे. व्हाट्सएपने देखील अशा स्वरूपाची कारवाई केली आहे. WhatsApp कडून 1.9 मिलीयन खात्यांवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement