SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका. प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध रहा. संमिश्र ग्रहमान राहील, काही अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. यशासाठी जास्त परिश्रम करावे लागतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. गैरसमज करून घेऊ नका. व्यवसायात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.

Advertisement

वृषभ (Taurus): अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्री वर्गाचा हात लागेल. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्‍यांशी जमवून घ्या. मित्रांकडून लाभाची शक्यता. केलेल्या अभ्यासाचा निश्चितच फायदा होईल. घरी लोकांची ये-जा चालू राहील. काहींना प्रवास करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आपली गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. काही कारणाने मनावर थोडा ताण आल्यासारखे वाटेल.

मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. तांत्रिक कामात चाल ढकल करू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित बदल घडून येतील. मनात थोडे निराशेचे विचार येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. तसेच ईश्वरी उपासनेचा फायदा होईल. नोकरीत तणावाचे वातावरण राहील. वरिष्ठाशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे.

Advertisement

कर्क (Cancer) : काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. दिवसभर कामात गुंतून राहाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पित्त विकाराचा त्रास संभवतो. कामानिमित्त प्रवास घडून येतील, भावंडांच्या भेटीगाठी होतील. घरी अनपेक्षित नातेवाईक येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. आर्थिक आवक चांगली राहील.

सिंह (Leo) : क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. मुलांच्या खोडकरपणाला आळा घालावा. निश्चयावर ठाम राहा. काहींना अचानक बदलीला सामोरे जावे लागेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि त्यांना मार्गदर्शन करा. आर्थिक आवक चांगली राहील. प्रवासाचे योग येतील.

Advertisement

कन्या (Virgo) : वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांती जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका. ग्रहमानाची अनुकूलता राहील. अनेक आघाड्यांवर यश मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. ती आपण यशस्वीपणे पूर्ण कराल विविध प्रकारचे लाभ होतील. वाहन सुख मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल.

तुळ (Libra) : भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. विविध प्रकारच्या सोयी सुविधा मिळतील. तुमचा प्रभाव वाढेल. घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. भावंडाच्या भेटी होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. मुलांच्या प्रगतीचा आढावा घ्या. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.

Advertisement

वृश्‍चिक (Scorpio) : कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मनापासून मदत कराल. काही कटू काही गोड अनुभव येतील. आर्थिक बाजू थोडी विस्कळीत होईल. वसुलीच्या कामांना खीळ बसल्यासारखे होईल. कर्ज प्रकरणे मंजूर होण्यात अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

धनु (Sagittarius) : स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल; मात्र कामे पार पाडताना वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. भावंडांशी सलोख्याचे संबंध ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत बदल होतील. अधिकार मिळेल; पण कामाचा व्याप वाढेल. अनपेक्षित पाहुणे येतील.

Advertisement

मकर (Capricorn) : अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल. विविध प्रकारच्या बदलांना सामोरे जावे लागेल. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल निष्कारण खर्च होईल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल; मात्र खर्चाची वेळ येईल तेव्हा लोक मागे हटतील आणि तुम्हाला पुढे करतील. त्यामुळे कुणाला कितीही वाईट वाटले तरी आर्थिक व्यवहार करताना जपून राहा.

कुंभ (Aquarious) : बदल लक्षात घेऊन वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका. रेस, सट्टा यांतून लाभ संभवतो. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. खर्चाच्या बाबतीत स्पष्टता ठेवायला पाहिजे. जीवनसाथीच्या कलेने घ्या. आपलेच घोडे पुढे दामटू नका. अन्यथा वादाचे प्रसंग येतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील.

Advertisement

मीन (Pisces) : सरकारी कामाला गती येईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. या सप्ताहात आपली अनुकूलतेकडे वाटचाल सुरू राहील, मात्र खाण्या पिण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य विषयक त्रास होऊ शकतो. दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. कामे करताना अधून-मधून आराम करणे आवश्यक आहे.

Advertisement