भारत विरुद्ध इंग्लड यांच्यातील 5व्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 416 धावा केल्या.. उपकर्णधार ऋषभ पंत (146), रवींद्र जाडेजा (104) यांच्यानंतर कॅप्टन जसप्रित बुमराह (35) यांच्या फलंदाजीमुळे टीम इंडियाला तारलं. कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंडचा संघ बॅकफुटवर गेलाय..
टीम इंडियाच्या बाॅलिंगसमोर इंग्लड टीमची अवस्था 5 बाद 98 झाली आहे. पावसामुळे इंग्लंडची पडझड थांबली.. मात्र, त्यानंतरही इंग्लंडला काडीमात्रही फरक पडलेला नाही. उलट, इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षक पाॅल काॅलिंगवूड याने भारतीय संघालाच इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील 3 दिवसांत कसोटीत जोरदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे..
इंग्लडचा भारताला इशारा…
भारतीय संघाच्या फलंदाजांनी इंग्लड संघाच्या बाॅलरची पिसे काढली असली, तरी इंग्लंडचा तोरा कायम आहे.. इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षक पाॅल काॅलिंगवूड म्हणाला, की “मला वाटत नाही की, आमच्यावर फार वेळ प्रेशर असेल, पण पंतने केलेल्या खेळीसाठी त्याला सॅल्युट करतो. तुम्ही जागतिक स्तरावरील खेळाडूंविरुद्ध खेळता, तेव्हा तुमचा खेळही त्याच पातळीचा होतो..”
ते म्हणाले, “आम्ही चौथ्या डावात विजयी आव्हानाचं पाठलाग करायला घाबरत नाही, हे आम्ही न्यूझीलंड विरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून दाखवून दिलंय.. आम्ही पारंपरिक पद्धतीने कसोटी खेळत नाहीये. आम्ही जास्तीत जास्त आक्रमक होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. तसेच विकेट्स घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा रन रेट कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे..”
पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा बराच वेळ वाया गेला. इंग्लंड संघाची अवस्था 5 बाद 98 अशी झालेली असून, इंग्लंडचा संघ अजूनही 356 धावांनी पिछाडीवर आहे. अशा वेळी पाॅल काॅलिंगवूडने एकप्रकारे भारतीय संघाला इशाराच दिला आहे. त्याला टीम इंडिया कसा प्रतिसाद देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..