SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ शिक्षकांना मिळणार जादा वेतनवाढ, ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय..!!

राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे.. 2000 सालापासून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना जादा वेतनवाढ दिली जात होती. मात्र, सहावा वेतन आयोग लागू झाला नि सरकारने आदर्श शिक्षकांना दिली जाणारी जादा वेतनवाढ बंद केली.. त्याविरोधात शिक्षकांनी न्यायालयीन लढा दिला.. अखेर सरकारला या शिक्षकांसमोर झुकावे लागले..

2018 पूर्वीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुन्हा एकदा जादा वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या ग्रामविकास खात्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्यातील सुमारे 1500 पेक्षा अधिक आदर्श शिक्षकांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात येते..

Advertisement

राज्यात जिल्हा परिषद स्तरावरुन जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. या शिक्षकांना 2000 पूर्वी कुठलीही वेतनवाढ दिली जात नव्हती. 12 डिसेंबर 2000 रोजी शासनाने आदर्श शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. या वेतनवाढीचा खर्च जिल्हा परिषदेने स्वनिधीतून करावा, असाही आदेश सरकारने दिला होता.

सहाव्या वेतन आयोगामुळे ब्रेक

Advertisement

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम मोठी झाली. त्यामुळे आदर्श शिक्षकांना दिली जाणारी जादा वेतनवाढ सरकारने गुंडाळली. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळूनही जादा वेतनवाढ मिळत नसल्याने हे शिक्षक नाराज झाले. त्यांनी हायकोर्टात धाव घेतली..

वाढीव वेतनामुळे पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सरकार वेतनवाढीत डावलत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अखेर न्यायालयाने 2018 पूर्वीच्या जिल्हास्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना जादा वेतनवाढीचा लाभ द्यावा, असा निकाल दिला.. त्यानंतर राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली.

Advertisement

मुंबई हायकोर्ट, तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठानेही शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला.. त्याविरोधात नाशिक जिल्हा परिषदेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने 13 एप्रिल 2022 रोजी नाशिक जिल्हा परिषदेचे याचिका फेटाळली.. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे 4 सप्टेंबर 2018 पर्यंतच्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement