SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

2 आठवड्यात नाॅर्मल होईल शुगर लेव्हल; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ 8 टिप्स येतील कामी

जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण ठेवले पाहिजे. जर, तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात (Blood Sugar Level) नसेल तर तुमच्या शरीरात (Body) अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. तुमच्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन कसे करावे ते शिकणे गरजेचे आहे.

1) आवळा ज्युस आणि हळद एकत्र करून घ्यावा. तसेच भोपळ्याचं सूप आणि शेवग्याचं सूप एक दिवसाआड नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात घ्यावं. एक दिवसाआड घेणं शक्य नसेल तर आठवड्यातून दोन वेळा भोपळ्याचं सूप आणि दोन वेळा शेवग्याचं सूप अवश्य घ्यावं.
2) दही, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ अतिशय कमी खावेत. त्याऐवजी बेसन, नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ खाण्यास प्राधान्य द्यावे.
3) दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर 5 ते 7 मिनिटे कटाक्षाने वज्रासनात बसावे.
4) पालक, मेथी, भोपळा, टोमॅटो, कारले, शेवगा या भाज्या तसेच जांभुळ, सफरचंद, आवळा, पपई, डाळिंब, किवी ही फळे अधिकाधिक प्रमाणात खावीत.
5) रात्रीच्या जेवण 8 वाजेच्या आधी व्हायला हवं. त्यानंतर साधारणपणे 3 तासांनी झोपावं. दुपारची झोप पुर्णपणे टाळावी.

Advertisement

6) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंडुकासन, शशांकासन, भुजंगासन, बालासन, धनुरासन या योगासनांचा सराव नियमितपणे केला पाहिजे. तसेच यासोबतच कपालभाती, अनुलोम विलोम हे दोन प्राणायामही करावेत. दररोज 45 मिनिटांचा व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे.

7) दररोज किमान 5 हजार पाऊलं तरी तुमचं चालणं झालंच पाहिजे. 10 हजार स्टेप्सपर्यंत चालू शकलात, तर ते अधिक उत्तम असंही त्यांनी सांगितलं.
8) सायकलिंग, कार्डिओ व्यायाम केले तरी उत्तम. व्यायाम शक्यतो सकाळी 9 वाजेच्या आधी सुर्यप्रकाशात केले तर त्याने अधिक फायदा होतो.

Advertisement