SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आपणही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच

मुंबई :

देशभरात डिजिटल माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच आर्थिक फसवणूक होऊ नये, म्हणून देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI (state bank of india) ने मोठा निर्णय घेतला आहे. आपणही जर SBI चे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. इथून पुढे तुम्हाला फक्त तुमच्या अधिकृत नोंदणी केलेल्या क्रमांक वापरूनच YONO ऍप्लिकेशन वापरता येणार आहे.

Advertisement

बँकेने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आता काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता इथून पुढे आपल्याला इतर कोणत्याही क्रमांकावरून बँकेची सेवा मिळवता येणार नाही.

बरेच असे ग्राहक आहेत, ज्यांचा बँकत खात्याला लिंक केलेला फोननंबर हा वेगळा आहे आणि ते वेगळ्याच फोनवरुन YONO ऍप्लिकेशन लॉग इन करून वापरत आहेत. अशावेळी सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो.

Advertisement

ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेऊन बँकेने YONO ऍपमध्ये हे नवीन अपग्रेड ठेवले आहे. यामुळे, ग्राहकांना केवळ एक सुरक्षित बँकिंग अनुभव मिळणार नाही तर ते ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणे देखील टाळतील. एवढेच नाही तर ग्राहकांच्या खात्याची सुरक्षाही वाढणार आहे.

Advertisement