छोट्या पडद्यावरील काॅमेडी स्टार कपील शर्मा आपल्या काॅमिक टायमिंगसाठी ओळखला जातो.. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा स्टार पडद्यामागील घटनांमुळे मात्र सतत वादात सापडल्याचे दिसते.. काही दिवसांपूर्वीच आपल्याच शोमधील काही कलाकारांबरोबर कपिलचे वाद समोर आले होते…
कपील शर्मा आता पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत आलाय.. कायद्याच्या कचाट्यात सापडलाय.. त्याच्याविरोधात चक्क अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आलाय.. कपीलवर नेमकं कशामुळे हे बालंट आलंय, ते जाणून घेऊ या..
नेमकं काय झालं..?
हे प्रकरण 2015 मधील आहे.. 2015 मध्ये कपिल शर्माने उत्तर अमेरिकेत 6 शो करण्यासाठी ‘साई यूएसए इंक’ सोबत ‘कॉन्ट्रेक्ट’ साइन केलं होतं. त्यासाठीची रक्कमही त्याला देण्यात आली होती. मात्र, त्याने फक्त 5 शो केले. त्याबद्दल कपिल शर्माने पैसे परत करणार असल्याचं सांगितलं होतं. पण अद्याप पैसे परत केले नाहीत अन् शो ही केले नाहीत.
‘साई यूएसए इंक’ या अमेरिकेतील प्रसिद्ध शोचे प्रमोटर अमित जेटली म्हणाले, की “कपिल शर्माकडून काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही. न्यायालयात जाण्यापूर्वी आम्ही कपिल शर्मासोबत अनेकदा बोलण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.. सध्या हे प्रकरण न्यूयॉर्कमधील न्यायालयात प्रलंबित आहे. निश्चितच आम्हाला न्याय मिळेल…”
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
‘कपिल शर्मा लाइव’ या कार्यक्रमासाठी आपल्या टीमसह कपिल उत्तर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. नुकताच त्याने टोरंटोमध्ये परफॉर्म केला आहे. तेथील फोटो व व्हिडिओ नुकतेच त्याने शेअर केले.. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो इंग्रजी बोलताना दिसतोय. गंमतीत तो म्हणतो, की त्याच्या टीम मेंबर्सना इंग्रजी भाषा येत नाही. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.