SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

CBSE 10th Result: दहावीच्या निकालाची तारीख ठरली; असा बघा तुमचा Result

मुंबई :

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाच्या घोषणेची लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. यापूर्वी, सीबीएसई निकाल 2022 जून महिन्यात प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा होती. सीबीएसई दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर केला जाणार, अशीही माहिती मिळत होती. सूत्रांनी तात्पुरत्या तारखाही जाहीर केल्या होत्या. मात्र आता एकदम अधिकृत घोषणा झाली असून उद्याच निकाल जाहीर होणार आहेत.

Advertisement

आता CBSE चा दहावीचा निकाल (CBSE Result 2022) हा उद्या म्हणजेच 04 जुलैला जाहीर होणार आहे. इतके दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन्ही टर्मचा निकाल 50:50 मार्किंग योजनेच्या आधारे लावण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर त्याचे प्रमाण बदलून 30:70 झाले.

वास्तविक, सीबीएसई बोर्डाची टर्म 1 परीक्षा होम सेंटरवर घेण्यात आली होती. यामध्ये परीक्षेदरम्यान अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना अनैतिक कृत्यांमध्ये मदत केल्याच्या तक्रारी होत्या. अशा स्थितीत बोर्डाने टर्म 1 ची टक्केवारी कमी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

यावर्षी सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत आहेत. यावर्षी सीबीएसईनं 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती.

  • CBSE बोर्डाचा 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी लिंक सापडतील.
  • आता तुम्हाला ज्या वर्गाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून आवश्यक तपशील सबमिट करावा लागेल. तुम्ही सबमिट करताच तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.

Advertisement