SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..! ‘या’ विद्यार्थ्यांचा होणार चांगला फायदा.!!

राज्यातील रात्रशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात 176 रात्रशाळा असून, पैकी एकट्या मुंबईत 150 हून अधिक रात्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. मात्र, या रात्रशाळांसाठी वर्ग उपलब्ध न होणे, तसेच शिक्षकांची कमतरता, आदी कारणांनी रात्रशाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र, आता लवकरच हे चित्र बदलणार आहे.

रात्रशाळांवर वर्षाला होणारा 34 कोटी रुपयांचा खर्च वाचविण्यासाठी दिवसा व रात्रशाळेत काम करणाऱ्या दुबार शिक्षक कमी करण्याचा निर्णय शासनाने 17 मे 2017 रोजी घेतला होता. त्यात दुबार शिक्षकांच्या जागी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचे ठरले. त्यानुसार, रात्रशाळांमधील 1358 दुबार शिक्षक, तसेच माध्यमिक रात्रशाळेतील 865 दुबार शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या होत्या.

Advertisement

नंतर या शिक्षकांच्या जागी दिवस शाळेतील 174 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. मात्र, पुरेसे शिक्षक नसल्याने रात्रशाळांमध्ये अध्यापनाचे काम सुरळीत झाले नाही.. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे समोर आल्यानंतर आता जुना शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.

रात्रशाळांबाबत सुधारित निर्णय

Advertisement

शालेय शिक्षण विभागाने नुकताच सुधारित शासन निर्णय जाहीर केला असून, त्यात मे 2017 पूर्वी जे शिक्षक रात्रशाळेत कार्यरत होते, त्यांना सेवा नियमानुसार कायम करण्यात येणार आहेत. तसेच रात्रशाळेत दुबार शिक्षकांना नियुक्त करण्याआधी विभागातील शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत का, याची खात्री केली जाणार असल्याचे सांगण्यात आले..

मुंबईसह अन्य महापालिका, खासगी शाळांमधील प्रयोगशाळा, शाळांमधील वर्ग, वाचनालये, खेळाची मैदाने, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा रात्रशाळांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत.

Advertisement

तसेच दिवसा नियमित शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना पुन्हा रात्रशाळेतही शिकविण्यास परवानगी देण्यात आली आहे. अर्थात, त्यासाठी नियमित शिक्षकाला कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा लागणार आहे. तसेच रात्रशाळेची वेळ अडिच तासांची करण्यात आली आहे.. मात्र, या निर्णयाबाबत राष्ट्रवादी शिक्षक सेलने विरोध केला आहे..

दुबार शिक्षकांऐवजी ‘टीईटी’ पात्र बेरोजगार शिक्षकांची रात्रशाळेत पूर्ण वेळ नियुक्ती करावी, तसेच रात्रशाळेची वेळ अडीच तासांऐवजी पूर्वीप्रमाणे साडेतीन तासांची करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल, असे राष्ट्रवादी शिक्षक सेलतर्फे सांगण्यात आले आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement