SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वाहनांच्या सुरक्षेच्या बाबतीत ‘या’ दोन भारतीय कंपन्यांचा जगात डंका; परदेशी कंपन्यांना टाकले मागे

मुंबई :

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांवरील वाढत्या अपघातांच्या विरोधात नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी काही कठोर पाऊले उचलली आहेत. इथून पुढच्या काळामध्ये वाहनांमध्ये सहा एअरबॅग्स असणं अनिवार्य आहे. यासहित वाहनांच्या टायर्सच्या बाबतीतही नियमावली जाहीर करण्यात आली आहे आणि लागू करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. सहा एअरबॅग्स असणं असा निर्णय घेतल्यानंतर काही कंपन्यांनी या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. नितीन गडकरी यांनी मात्र आपण या निर्णयावर ठाम असल्याचे दाखवून दिले आहे.

Advertisement

देशात ह्युंदाई, सुझुकीच्या गाड्या जास्त विक्री होत असल्या तरी टाटा, महिंद्रा कंपनीच्या गाड्या सुरक्षेच्या दृष्टीने अव्व्ल ठरत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने टॉप 10 कारमध्ये टाटा पंच, महिंद्रा एक्सयूव्ही 300 , टाटा अल्ट्रॉझ, टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा एक्सयूव्ही 700 या वाहनांचा समावेश आहे.

या वाहनांना सुरक्षेच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. देशातल्या सर्वात सुरक्षित 5 गाड्यांमध्ये टाटा आणि महिंद्रा कंपनीच्या गाड्यांचा समावेश आहे. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित कार घेण्याचा विचार करत असल्यास महिंद्रा एक्सयूव्ही 700 ही कार बेस्ट आहे.

Advertisement

चाईल्ड सेफ्टीच्या बाबतीत महिंद्रा एक्सयूव्ही 700ला सर्वाधिक मानांकन आहे. या कार पाठोपाठ महिंद्रा थार, टाटा पंच, महिंद्रा एक्सयूव्ही 300 आणि टोयोटा अर्बन क्रूझर या वाहनांचा क्रमांक लागतो. केंद्र सरकारनं गाड्यांच्या सेफ्टीबाबत होणारी कार क्रॅश टेस्ट देखील आता भारतात घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांना आता त्यांच्या कार क्रॅश टेस्टसाठी ग्लोबल एनसीएपीकडे पाठवण्याची गरज नसेल अशी सरकारने घोषणा केली आहे.

Advertisement