SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार, ‘या’ बँकांकडून कर्ज घेणं महागणार..

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीमुळे काही दिवसांपासून बँकांनी कर्जदर वाढीचा ग्राहकांना झटका दिला आहे. आज शुक्रवारी 1 जुलै 2022 रोजी तीन बँकांनी कर्जदरात (एमसीएलआर) वाढ केली. आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन बँक या तीन बँकांनी कर्जदर 0.15 ते 0.20 टक्क्यांच्या दरम्यान वाढवला असल्याचं समजतंय. या व्याजदर वाढीनंतर अनेक बँकांची कर्जे (Loan) महागणार आहेत. यामुळे तुमच्या कर्जाच्या मासिक हप्त्यात (EMI) सुद्धा वाढ होणार आहे.

ICICI बँकेने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या नवीन व्याजदरांनुसार, आता एका दिवसाच्या MCLR चे व्याजदर 7.30 ते 7.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR चे व्याजदर सुद्धा 7.30 वरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. 3 महिन्यांसाठी MCLR चे व्याजदर 7.35 वरून 7.55 टक्के झाले आहेत. याशिवाय 6 महिन्यांच्या MCLR चे व्याजदर 7.50 टक्क्यांवरून 7.70 टक्के तर 1 वर्षाच्या MCLR चे व्याजदर आता 7.55 टक्क्यांवरून 7.75 टक्के झाले असल्याची माहीती आहे.

Advertisement

इंडियन बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जाचा दर, ट्रेझरी बिलांशी संलग्न कर्जदर व बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट अशा काही कर्ज दरात वाढ केली. बँकेने एक निवेदन देताना म्हटले की,”रविवारपासून त्यांनी आपला मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे”, असं म्हटलं आहे. त्यावरून Indian Bank कडून एक वर्षाचा बेंचमार्क MCLR 7.40 टक्क्यांवरून 7.55 टक्के करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, बहुटेक कंझ्युमर लोनचे व्याजदर याच आधारावर निश्चित केले जातात. बँकेच्या नियामक फाइलिंगमध्ये बँकेने म्हटले आहे की,”बँकेकडून 1 दिवस ते 6 महिन्यांच्या कर्जावर MCLR समान प्रमाणात 6.75 वरून 7.40 टक्के वाढवला गेला आहे”, असं म्हटलं आहे. MCLR वाढल्याने टर्म लोनवरील EMI वाढण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एक बँक पंजाब नॅशनल बँकेनं (Punjab National Bank) देखील कर्जदरात 0.15 टक्क्यांची वाढ केली आहे. काल (ता. 1 जुलै) शुक्रवार पासून सुधारित कर्जदर लागू झाल्याचे बँकेनं म्हटलं आहे. त्यानुसार एका दिवसासाठीचा कर्जदर 6.90 टक्के असून एक महिन्यासाठी तो 6.95 टक्के आहे. तीन महिन्यांसाठी 7.05 टक्के आणि 6 महिन्यांसाठी कर्जाचा दर 7.25 टक्के इतका वाढला आहे. तीन वर्षांसाठी तो 7.55 टक्के वाढला असल्याचे बँकेनं म्हटलं आहे. जून महिन्यात बँकेनं एमसीएलआर 0.15 टक्क्यांनी वाढवला होता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement