स्मार्टफोन हातात आल्यापासून प्रत्येकाचं जगच बदललं आहे.. इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातली माहिती मिळू लागली.. स्मार्टफोनमध्ये ‘मेसेंजिंग अॅप’ आले नि सोशल मीडियाचा जन्म झाला. देश-परदेशात दूर राहणारे नातेवाईक नि मित्रांच्या संपर्क साधता येऊ लागला..
‘व्हाॅट्स अॅप’ त्यापैकीच एक अतिशय लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप.. जगात ‘व्हाॅट्स अॅप’ वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे.. मात्र, ते वापरताना तितकीच दक्षता घेणंही महत्वाचं आहे.. बरेच जण ‘व्हाॅट्स अॅप’च्या पॉलिसीकडे दुर्लक्ष करतात नि मग युजर्सना जेलवारी करण्याची वेळही येऊ शकते.
‘व्हॉट्स अॅप’ कडून आता पॉलिसीचे कठाेर अंमलबजावणी केली जात आहे.. या पाॅलिसीचे पालन न करणाऱ्यांना थेट ब्लाॅक केलं जात आहे.. त्यामुळे ‘व्हाॅट्स अॅप’ मेसेज पाठवताना काळजी घेणं गरजेचं आहे. त्यातही एखाद्या ‘व्हॉट्स अॅप’ ग्रुपचे अॅडमिन असाल, तर तुमच्याच नव्हे, तर ग्रुपमधील अन्य सदस्यांच्या पोस्टवर लक्ष द्यावं लागतं..
या चुका टाळा..!!
हिंसा पसरवणारे मेसेज
‘व्हॉट्स अॅप’वर (WhatsApp) हिंसा पसरवणारे, समाजात द्वेष निर्माण करणारे मेसेज येत असतील, तर ते शेअर करु नका.. अशा पोस्टबद्दल कोणी आक्षेपार्ह म्हणत रिपोर्ट केल्यास, तुमचं ‘व्हॉट्स अॅप’ अकाउंट ब्लॉक केलं जाऊ शकतं.. लाखो अकाउंट्सवर कंपनीने आतापर्यंत बंदी घातली आहे.
अर्थात ‘व्हॉट्स अॅप’ अकाउंट रिकव्हर करता येत असले, तरी त्यासाठी युजर्सना स्पष्टीकरण द्यावं लागतं. त्यामुळे द्वेषपूर्ण पोस्ट शेअर करु नका.. तसेच, कोणाच्याही धार्मिक भावना दुखवणाऱ्या पोस्ट शेअर करू नयेत.
आक्षेपार्ह व्हिडीओ टाळा
दंगली पसरवण्यासाठी ‘व्हॉट्स अॅप’ ग्रुप्सचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर आल्यास, ग्रुप सोडा व पोलिसांना कळवा. पोलिस अशा ग्रुप्सवर कायदेशीर कारवाई करतात.
तसेच, ‘चाइल्ड पॉर्न’ शेअर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाते. त्यासाठी देशात कडक कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह माहिती किंवा व्हिडिओ येत असल्यास त्याबद्दल पोलिसांना कळवा. ‘व्हॉट्स अॅप’वरून अनेकदा बेकायदा कामेही केली जातात. अशा बाबी निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती द्यावी.