SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रस्त्यासोबत समुद्रातही धावणार ‘ही’ कार; जगातल्या सर्वात वेगवान कारचे जाणून घ्या फीचर्स

मुंबई :

जगभरात सध्या तंत्रज्ञानाच्या जीवावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याचं काम सुरु आहे. तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिक कार आणि इतरही काही गाड्यांच्या बाबतीत असणाऱ्या संकल्पना पूर्ण करण्यात आल्या आहेत. अशातच आता एक खास कार आली आहे, जी पाणी आणि रस्ते दोन्हीवर धावते. या कारचं नाव आहे ‘सी लायन’ (Sea Lion) म्हणजेच समुद्रातील सिंह. जगातील सर्वात वेगवान Amphibious Car म्हणून ही कार चर्चेत आली आहे.

Advertisement

या कारबद्दल लोकांमध्ये कमालीचे आकर्षण आहे. या कारचे निर्माते एम. विट (M. Witt) यांनी ही कार फॅन्टसी व्हेंचर्समध्ये विक्रीसाठी ठेवली आहे. जर समजा तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला 25,9500 डॉलर्स (सुमारे 2 कोटी रुपये) खर्च करावे लागतील. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार पाण्यात असताना आणि जमिनीवर चालत असताना आपलं रूप बदलू शकते. म्हणजेच काही मिनिटांमध्ये ही कारमधून बोटीमध्ये बदलते.

तुम्ही ही कार रस्त्यावरून आणि पाण्यात घेऊन जाऊ शकता आणि वाहतुकीच्या दोन्ही पद्धतींचा आनंद घेऊ शकता. या कारचे इंजिन Mazda 13B रोटरी हे असून, या इंजिनाच्या मदतीने ही कार पाण्यावर 60 mph (97 किमी) वेगाने धावते. ही कार रस्त्यावर ताशी 290 किमीचा वेग धरू शकते. ही कार बनवण्यासाठी डिझायनर M.Witt यांना सुमारे 6 वर्षे लागली.

Advertisement

या कारची बॉडी ही सीएनसी माइल्ड पीस आणि टीआयजी वेल्डेड 5052 अल्युमिनियमपासून बनलेली आहे. ‘सी लायन’ कार ही जागतिक वेगाच्या विक्रम स्पर्धेत प्रमुख स्पर्धक असून कारची स्पर्धा सुमारे 25 अन्य वाहनांशी आहे.

Advertisement