SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लवकरच पाऊस देणार खुशखबर; महाराष्ट्रात ‘असा’ असेल पाऊसाचा अंदाज

मुंबई :

पावसाळ्याचा मौसम आता खऱ्या अर्थाने सुरु झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जूनपेक्षा जुलै महिन्यामध्ये अधिक समाधानकारक पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानावरून वर्तवण्यात आली आहे. मध्य भारत, उत्तर भारत, दक्षिण भारताच्या बहुतांश भागात जुलैमध्ये सरासरी किंवा सरासरीहून अधिक पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

Advertisement

यावर्षी देशभरात सरासरी 94 ते 106 टक्के पाऊस पडेल. 1971 ते 2020 या कालावधीमध्ये सरासरी देशात 280 मिलीमीटर पावसाची नोंद होते. 29 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार मध्य भारतामध्ये पर्जन्यमानात 33 टक्के इतकी तूट पडली होती.

दक्षिण भारतात 14 तर वायव्य भारतात 20 टक्के इतकी तूट पडली होती. देशभरात 10 टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला होता. जुलैमध्ये पाऊसाची परिस्थिती बदलेल असा अंदाज आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात तसेच मध्य भारताच्या लगतच्या भागांमध्ये, दक्षिण भारताच्या पश्चिम क्षेत्रामध्ये पाऊस सरासरी किंवा त्याहून कमी असेल असं अनुमान आहे. याच कालावधीमध्ये प्रशांत महासागर विषुववृत्तीय क्षेत्रामध्ये निना स्थिती कायम राहण्याचीही शक्यता आहे.

Advertisement

जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये नकारात्मक इंडियन ओशन डायपोलचा संभव असण्याची शक्यता आहे. हा घटक भारतातील पावसावर परिणाम करत असल्याने पावसामध्ये खंडदेखील पाडू शकतो. या पार्श्वभूमीवर समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानावरही नजर ठेवण्यात येते. विदर्भाच्या काही भागांमध्ये तसेच रायगड, ठाणे, मुंबई क्षेत्रामध्ये सरासरीइतका पाऊस पडू शकेल असं देखील पूर्वानुमानावरून सांगण्यात आलं आहे. देशभरात बहुतांश भागामध्ये चालू महिन्यात सरासरी किंवा त्याहून अधिक कमाल तापमान असेल

Advertisement