मुंबई :
एक महिन्यापूर्वी देशात केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांवरचे काही कर कमी करण्यात आले. या निर्णयानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. मागील आठवड्यापासून तेलांच्या म्हणजेच इंधनांच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत.मात्र आता सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून इंधन दर वाढला आहे. केंद्र सरकारनं नुकतीच पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्क(कर)मध्ये वाढ केली आहे.
सरकारनं पेट्रोलच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कामध्ये 5 रुपयांनी वाढ केली आहे तर डिझेलवर 12 रुपये प्रति लिटरनं वाढ केली आहे. एवढंच नाही तर एटीएफ निर्यातीवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लिटर 6 रुपयांनी वाढ केली गेलीय. या सर्व गोष्टींचा घरगुती इंधनावर कसलाही परिणाम होणार नाही. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिझेल आणि विमान इंधनावरील निर्यात शुल्क वाढवण्याचे कारण स्पष्ट करताना म्हटलं आहे कि सध्या भारताला परवडणाऱ्या किमतीत तेल आयात करणं खूप कठीण जात आहे.
याचं कारण म्हणजे जागतिक राजकीय परिस्थितीमुळे जगभरात तेलाच्या किमतींनी मोठी झेप घेऊन टाकली आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने गडगडाट होत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. यासाठी दर 15 दिवसांनी शुल्कवाढीचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं निर्मला सीताराम यांनी म्हटलं आहे. सध्याच्या घडीला देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे.