SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जिओ’ चा 4G मोबाईल फक्त 4 हजार रुपयांत, कुठे आहे ही खास ऑफर..?

रिलायन्सने युजर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. रिलायन्सने गेल्या वर्षीच आपला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. Amazon वर अशी ऑफर आहे की, JioPhone Next हा 4G स्मार्टफोन तुम्ही खूपच स्वस्तात खरेदी करु शकणार आहात.

रिलायन्स कंपनीने हा स्मार्टफोन तेव्हा 6,499 रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. परंतु ग्राहक ईएमआयवर (JioPhone Next on EMI) 2,000 रुपये डाऊनपेमेंट देऊन फोन खरेदी करू शकतात. पण, यापेक्षाही आणखी स्वस्त तुम्हाला Amazon या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे.

Advertisement

ॲमेझॉन इंडिया या ई-कॉमर्स वेबसाईटवर इतर कोणत्याही 4G स्मार्टफोनच्या किमतीपेक्षा अगदी कमी किंमतीत म्हणजेच 4324 रुपयांना फोन खरेदी करता येईल. या किंमतीत किंचित बदल होऊ शकतो. एवढंच नव्हे तर ही किंमत आणखी कमी होईल ती सिटीबँक कार्डच्या ऑफरमुळे. म्हणून Citibank क्रेडिट कार्डने हा स्मार्टफोन खरेदी घेतल्यास 10 टक्के सूट मिळू शकते.

स्मार्टफोनचे आकर्षक फीचर्स

Advertisement

👉 JioPhone Next हा एक परवडणारा 4G स्मार्टफोन आहे जो 5.45-इंच मल्टीटच HD+ (720×1440 पिक्सेल) डिस्प्लेसह येतो.
👉 जिओच्या या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 3500mAh बॅटरी आहे.
👉 JioPhone Next 2GB पर्यंत RAM आणि 32GB अंतर्गत स्टोरेजसह येईल.
👉 JioPhone Next स्मार्टफोन Android 11 सह येणारा हा ड्युअल-सिम 4G स्मार्टफोन आहे. फोनमध्ये PragatiOS देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 SoC प्रोसेसर आहे.
👉 Jio च्या या एंट्री-लेव्हल फोनमध्ये प्री-इंस्टॉल JioSaavn, MyJio, JioTV, JioCinema Apps चा आनंद घेऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement