SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 8 मिनिटांत ‘फुल्ल चार्जिंग’, ‘या’ कंपनीचा मोबाईल घालणार धुमाकूळ…

मोबाईल क्रांती झाल्यापासून स्मार्टफोन मार्केटमध्ये सतत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आजकाल मार्केटमध्ये असे अनेक स्मार्टफोन आले आहेत, जे ‘फास्ट चार्जिंग’ला सपोर्ट करतात..सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे.. अशा वेळी कमीत कमी वेळेत चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनला मागणी वाढते आहे..

सध्या बाजारात अशाच एका कंपनीच्या स्मार्टफोनची जोरदार चर्चा आहे.. ती म्हणजे, ‘इन्फिनिक्स’.. गेल्या वर्षी ‘इनफिनिक्स’ कंपनीने (Infinix) ‘कॉन्सेप्ट मॉडेल’ म्हणून 160 वॉट अल्ट्रा फास्ट चार्ज तंत्रज्ञानाची घोषणा केली होती. आता त्याच्याही पुढे जाताना, कंपनीने 180 वॉट ‘थंडर चार्ज तंत्रज्ञान’ लॉंच केलेय. (Infinix flagship)

Advertisement

‘इनफिनिक्स’चे नवीन चार्जिंग तंत्रज्ञान 4500 एमएएच बॅटरी फक्त 4 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते, तर बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त 8 मिनिटे लागणार आहेत. हे तंत्रज्ञान कंपनी आगामी ‘फ्लॅगशिप’ फोनमध्ये उपलब्ध करून देणार असून, या वर्षाच्या शेवटी हा स्मार्टफोन लॉंच होणार असल्याचे सांगण्यात येते.

दोन प्रकारचे ‘चार्जिंग मोड’

Advertisement

‘इनफिनिक्स’च्या या तंत्रज्ञानात दोन प्रकारचे ‘चार्जिंग मोड’ असतील. एक म्हणजे ‘फ्युरियस मोड’.. जो ‘इनफिनिक्स नोट-12 व्हीआयपी’वर उपलब्ध असेल, जो जास्तीत जास्त वेगाने फोन चार्ज करील.. त्यात एक सामान्य मोडही असेल, जो जलद चार्ज करतानाच स्मार्टफोनचे तापमान कमी ठेवणार आहे.

‘इनफिनिक्स’ने नवीन ‘8C बॅटरी सेल’ विकसित करण्यासाठी जगातील आघाडीच्या बॅटरी उत्पादक कंपन्यांसोबत काम केलंय.. कमी वेळेत स्मार्टफोन पूर्ण चार्ज होण्यासाठी, कंपनी 4,500 एमए.एच.ची एकत्रित क्षमता मिळविण्यासाठी दोन 8C रेटेड बॅटरी वापरणार आहे..

Advertisement

स्मार्टफोन, चार्जर व चार्जिंग केबलच्या संरक्षणासाठी या चार्जिंग तंत्रज्ञानात 111 सॉफ्टवेअर व हार्डवेअर सुरक्षा यंत्रणा असेल. शिवाय, त्यात 20 सेन्सर्स असतील. ज्यामुळे यूएसबी पोर्ट, चार्जिंग चिप्स, बॅटरी आदींच्या तापमानावर लक्ष ठेवता येईल. चार्जिंग तंत्रज्ञान हे सुनिश्चित करील, की तापमान 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नसेल.. बॅटरीचे नुकसान टाळण्यास ते मदत करील..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement