SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकात कुटल्या 35 धावा; युवराजच्या कामगिरीची झाली आठवण..!!

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यातील पाचवा कसोटी सामना बर्मिगहॅम येथे खेळवला जात आहे.. पहिल्या दिवशी भारतीय संघ संकटात सापडलेला असताना, ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांनी भारताचा डाव सावरला होता. या दोघांनी पहिला दिवस गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने फलंदाजीत अनोखा विक्रम आपल्या नावे केलाय..

या कसोटीतील 84 वी ओव्हर टाकण्यासाठी इंग्लडचा स्टुअर्ट ब्रॉड आला नि समोर बुमराहला पाहून त्याच्यावर बाऊन्सरचा मारा करु लागला.. मात्र, बुमराहने त्याची अशी काही जबरदस्त धुलाई केली, की नवा विक्रम झाला. ब्राॅडच्या या ओव्हरमध्ये बुमराहने तब्बल 35 धावा अक्षरक्ष: लुटल्या.. त्यात एक वाइड व एका नो बॉलचाही समावेश आहे..

Advertisement

ब्राॅडच्या या षटकामधील शेवटचा चेंडू वगळता, बुमराहने प्रत्येक चेंडू सीमेपार धाडला. त्यामुळे त्याची ही भन्नाट कामगिरी विक्रमी ठरलीय. यापूर्वी एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ब्रायन लारा याच्या नावावर होता. 2003 मध्ये त्याने पिटरसनच्या गोलंदाजीवर एका षटकात 28 धावा कुटल्या होत्या. मात्र, भारताचा फास्ट बाॅलर व मॅचसाठीचा कॅप्टन बुमराह याने त्याचा हा विक्रम आपल्या फटकेबाजीने अखेर मोडीत काढला..

Advertisement

षटकात नेमकं घडलं..?

  • स्टुअर्ट ब्राॅडच्या 84 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बुमराहने चौकार लगावला.
  • पुढचा चेंडू बुमराहच्या डोक्यावरुन गेला, उंचीमुळे हा चेंडू वाइड देण्यात आला.
  • त्याच्या पुढच्या चेंडूवर बुमहारने षटकार ठोकला.. त्यात तो चेंडू ‘नो बॉल’ निघाला.. त्यामुळे एक बाॅल झालेला असतानाच 16 धावा निघाल्या होत्या..
  • पुढचा बाॅल ब्रॉडने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फुलटाॅस झाला नि बुमराहने ‘लाँग ऑन’ला चौकार खेचला.
  • तिसऱ्या चेंडूवरही बुमराहच्या बॅटची कडा लागून चेंडू फाइन लेगच्या दिशेने चौकार गेला.
  • चौथ्या चेंडूवर बुमराहने जोरात बॅट फिरवली नि फटका चुकला तरी चेंडू सीमारेषेपार गेला.
  • पाचव्या चेंडूवर ब्रॉडला बुमराहने खणखणीत षटकार लगावला.
  • षटकातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने एक धाव घेत स्वत:कडे स्ट्राइक घेतली.

2007 साली भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंहने इंग्लंडचा याच स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 चेंडूंवर 6 षटकार लगावले होते. एका षटकात 36 धावा ठोकण्याचा पराक्रम युवराजने केला होता. त्याचीच आठवण बुमराहने आज करुन दिली.. त्यामुळे मैदानात बुमराहच्या नावाचा जयघोष सुरु होता..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement