लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच कधी तरी दाताच्या दुखण्याला तोंड द्यावे लागते. खरं तर दात किडणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. दातांची व्यवस्थित स्वच्छता न केल्याने, ही समस्या निर्माण होते.. चॉकलेट किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने दातांमध्ये ‘बॅक्टेरिया’ वाढू लागताे. त्यामुळे दातांची पोकळी निर्माण होते.
वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास दातांच्या (Dental Health) किडण्यापासून, दुखण्यापासून (Cavity) व त्यावरील खर्चापासून वाचवू शकता. त्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊ या. जे तुम्हाला नक्कीच मदत करतील.
दात दुखीवर घरगुती उपाय..
ज्येष्ठ मध : दातांमधील पोकळी किंवा कीड घालवण्यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर वापरू शकता… जेष्ठ मध खरेदी करू शकता किंवा घरच्या घरी जेष्ठ मधाच्या मुळापासून पावडर बनवू शकता. ही खूपच गुणकारी आहे.. या पावडरने ब्रश करुन स्वच्छ धुवा.
कडुलिंब – अनेक जण कडुलिंबाने दात घासतात, ज्यामुळे त्यांना दातांसंबंधी कोणतीही समस्या येत नाही. त्यामुळे पोकळी दूर करण्यासाठी आणि दातांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी रोज सकाळी कडुनिंबाच्या काडीने दात घासू शकता..
हर्बल पावडर – दोन चमचे आवळा, एक टी-स्पून कडुलिंब, अर्धा चमचा दालचिनी पावडर, बेकिंग सोडा व अर्धा चमचा लवंग पावडर एकत्र करून ‘हर्बल पावडर’ तयार करा.. त्याचा वापर करुन नीट दात घासल्यास दातातून पोकळी आणि रक्तस्रावाची समस्याही संपेल.
नारळ तेल – श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करतात.. खोबरेल तेलाने गुळण्या केल्यास प्लेक, बॅक्टेरिया व दात सडण्याच्या समस्या दूर होईल. हे पोकळी दूर करण्यासाठी सर्वात शक्तिशाली उपायांपैकी एक आहे.
काय काळजी घ्याल..?
- दारु पिणे, स्मोकींग यांसारख्या व्यसनांपासून दूर राहिल्यास दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
- मसालेदार, तळलेले, चमचमीत, ब्रेडचे पदार्थामुळे दातांची समस्या वाढते.. सतत गोड खाणे, चहा-कॉफीच्या अतिसेवनामुळेही दाताच्या समस्या निर्माण होतात.
- दातांच्या दुखण्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास कीड वाढते व मग उपचार व खर्चही वाढत जातो.
- दिवसातून न चुकता दोन वेळा ब्रश करावा.
- दातांमध्ये ब्रश जाऊ शकत नसलेल्या ठिकाणी ‘फ्लॉसिंग’चा आवर्जून वापर करा.
- जीभ नियमित साफ करा, त्यामुळे तोंडाचे आरोग्य चांगले राहते.
- दर 6 महिन्यांनी नियमितपणे दातांची तपासणी करुन घ्या.