SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार! महाराष्ट्रातून मोठी आकडेवारी समोर

मुंबई :

कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेची भीती असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा कोरोनानं (Covid-19) डोकं वर काढलं आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,249 कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. एकूण कोरोना रूग्णांपैकी 978 रूग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ बघता सर्वांचच टेंशन वाढलं आहे.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यात 3,249 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असताना एका दिवसात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात 1 जुलैपर्यंत 23,996 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात पावसाळ्यामुळे वेगवेगळ्या आजरांचा प्रसार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Advertisement

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 196.18 कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतातील कोरोनाच्या आकडेवारीनं 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांचा टप्पा ओलांडला होता. कोरोनाबाधितांची संख्या 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबरला 1 कोटींवर पोहोचली होती.

Advertisement