पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे बाजारात कागदी वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.. कपडे, खाद्यपदार्थ, औषधे, दागिन्यांसह अन्य वस्तू पॅक करण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर केला जात असल्याचे दिसते..
देशभरात ‘सिंगल यूज प्लास्टिक’वर बंदी घातली आहे. त्यामुळे आता प्लॅस्टिक प्लेट्स, स्ट्रॉ, कप, चमचे अशा अनेक वस्तू वापरता येणार नाहीत. त्या जागी कागदापासून बनवलेल्या वस्तू वापराव्या लागणार आहेत. त्यामुळे साहजिकच कागदापासून बनवलेल्या वस्तूंना मागणी वाढणार आहे.
नोकरीऐवजी तुम्ही एखादा व्यवसाय करण्याच्या विचारात असाल, तर सध्या कागदापासून वस्तू तयार करण्याच्या व्यवसायात चांगली कमाईची संधी आहे.. हा व्यवसाय असंघटित क्षेत्रात येतो. शिवाय, अगदी कमी भांडवलातही छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करुन चांगला नफाही मिळवता येतो..
किती खर्च येईल..?
पेपर कप युनिटसाठी लागणाऱ्या मशीनचा आकार फक्त 2 ते 5 फूट असतो. त्यामुळे छोट्या खोलीतूनही हा व्यवसाय सुरु करता येतो.. या व्यवसायासाठी 2 मशीन्स लागतात. एक म्हणजे, ‘ऑटोमॅटिक पेपर प्लेट’ बनवण्याचे मशीन, तर दुसरी विविध आकारातील कप व प्लेट्स बनवण्याची मशीन.
छोट्या मशीनची किंमत 80,000 रुपयांपासून सुरू होते. त्याद्वारे रोज 10 हजार ते 40 हजार पेपर कप व प्लेट्स बनवता येतात. या व्यवसायासाठी जास्त कर्मचारी लागत नाही. मशीन चालवण्यासाठी फक्त 2 कामगार लागतात. मशीन चालविण्यासाठी अनुभवी व्यक्ती व त्याला मदत करण्यासाठी एक मदतनीस लागेल.
कमाई किती होईल..?
ऑटोमॅटिक मशिनद्वारे रोज सुमारे 40,000 पेपर कप-प्लेट्स तयार करता येतात.. एक पेपर कप किंवा प्लेट बनवण्यासाठी 20 पैसे खर्च येतो. त्यानुसार 8 हजार रुपये खर्च येईल. ते 10 पैशांच्या नफ्यावर विकले, तरी 12,000 रुपये होतील.. तुम्हाला रोज 4 हजार रुपयांचा नफा होईल.
तुमची कमाई ही प्रॉडक्ट्सचा दर्जा नि विक्रीवर अवलंबून असते. विक्रीत वाढ होईल, तसा नफा वाढत जाईल. या व्यवसायातून दर महिन्याला किमान 60 हजार रुपये सहज मिळतील. ‘पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग’ युनिट इन्स्टॉल करण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 75 टक्के कर्जही मिळते. तुम्हाला 25 टक्के रक्कम गुंतवावी लागेल.
कर्जाबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://www.mudra.org.in/