SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : राजपाल यादववर 20 लाखांच्या फसवणुकीचा आरोप; पोलिसात हजर राहण्याचे आदेश

मुंबई :

आपल्या अभिनयाने लोकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता राजपाल यादव आता आता एका मोठ्या फसवणुकीच्या आरोपावरून अडचणीत आला आहे. राजपाल यादव वर 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. इंदौर पोलिसांनी त्याच्या विरोधात नोटीस जारी केली आहे. अभिनेत्याला 15 दिवसांच्या आत पोलिसांच्या समोर हजर रहावं लागणार आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरमधील बिल्डर सुरिंदर सिंग यांनी राजपाल यादवविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राजपाल यादवने माझ्या मुलाला सिनेृष्टीत पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर पाठिंबा देण्यासाठी 20 लाख रुपये घेतले होते. तसेच त्याला सिनेसृष्टीत काम करण्यासाठी कोणती मदतही केलेली नाही. शिवाय सुरिंदर पैसे मागायला त्याच्याकडे गेला, तेव्हा तो गायब होता. फोनही उचलायचा नाही. म्हणूनच बिल्डरनं अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली. तुकोगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. आता अभिनेत्याला 15 दिवसांत हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले उपनिरीक्षक लालन मिश्रा यांनी सांगितले की, सुरिंदर सिंग यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणाची तक्रार दिली होती. याच आधारे अभिनेत्याला नोटीस बजावण्यात आली असून त्याला 15 दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान राजपाल यादव हा काही दिवसांपूर्वी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात दिसला होता. यात त्याने छोटा पंडितची भूमिका साकरली होती. यापूर्वीही त्याने ‘भूल भुलैया’मध्ये छोटा पंडितची भूमिका साकारली होती. तसेच तो ‘अर्ध’ चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसला होता. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झाला.

Advertisement