SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 2 जुलै 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ भारत आणि इंग्लंड कसोटी सामन्यात ऋषभ पंतचे 111 चेंडूत केल्या 146 धावा, जाडेजानेही अर्धशतक (83*) केलं पूर्ण; पहिल्या दिवशी भारताच्या 338/7 धावा

✒️ इंधनावरील निर्यात शुल्क वाढले, रिलायन्स इंडस्ट्रीजला शुक्रवारी मोठा फटका; शेअर तब्बल 8.7 टक्क्यांनी घसरले, तब्बल 1.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Advertisement

✒️ रेल्वेतील आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वेत गॅस वापरास बंदी, इलेक्ट्रीक शेगडी वापरण्यास परवानगी; रेल्वे प्रशासनाने दिले आदेश

✒️ शिवसेनेच्या नेते एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे 39 आमदार सोबत घेऊन केलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या नेते पदावरून काढले; उध्दव ठाकरे यांनी जारी केलं पत्र

Advertisement

✒️ मणिपूरमध्ये नोनी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या पोहोचली 20 वर; मृतांमध्ये 15 भारतीय लष्करी जवान, 50 लोक बेपत्ता असल्याची माहीती

✒️ ठाकरे पक्षबांधणीत सक्रिय, एकनाथ शिंदेंच्या विरोधकाला ठाकरेंकडून ताकद, माजी आमदार सुभाष भोईर यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी निवड

Advertisement

✒️ सोनू सूद शिर्डीत अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम बनवणार, सोनू सूदने साई समाधीचे दर्शन घेतले, शिंदे सरकारलाही दिल्या शुभेच्छा

✒️ शिंदेंपुढे सत्ता वाचवण्याचे आव्हान: सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम दिलासाच्या आधारावर सरकार स्थापन, बंडखोर अपात्र ठरले तर सत्तांतर अटळ

Advertisement

✒️ संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 18 जुलैपासून सुरुवात, लोकसभा सचिवालायाने प्रसिद्धीपत्रक जारी करत अधिवेशनाची तारीख केली जाहीर

✒️ OnePlus Nord 2T भारतात लाँच: 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या स्मार्टफोनसाठी किंमत 28,999 रुपये, 5 जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर खरेदी करता येणार

Advertisement