SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

WhatsApp ने महिलांसाठी लाँच केले ‘हे’ खास फीचर; मासिक पाळीसह ट्रॅक करता येणार ‘या’ तीन गोष्टी

जगभरात सध्या सर्वाधिक लोकप्रियअ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅपचे नाव घेतले जाते. व्हॉट्सअ‍ॅप हे फक्त चॅटिंगचं नाही तर व्हिडीओ शेअरिंग, ग्रुप कॉल्स, व्हिडिओ कॉल्स आणि इतरही गोष्टींसाठी वापरलं जातं. वापरकर्त्यांना खुश करण्यासाठी सातत्याने व्हॉट्सअ‍ॅप नवीन नवीन आकषर्क फीचर्स लाँच करत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने आता महिलांची चिंता दूर करण्यासाठी एक विशेष फीचर लाँच केले आहे. महिलांचे हायजिन ब्रँड, सिरोनाशी व्हॉट्सअ‍ॅपने हातमिळवणी केली आहे. महिलांना त्यांच्या मासिक पाळीचा मागोवा घेण्यासाठी यापुढे कोणत्याही इतर थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज भासणार नाही.

याचं कारण म्हणजे महिलांना मासिक पाळीची माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहे. सिरोना यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की व्हॉट्सअ‍ॅपवर हे फीचर आणण्यामागे तीन प्रमुख उद्देश आहेत. मासिक पाळी ट्रॅक करणे, दुसरा गर्भधारणा आणि शेवटचा म्हणजे गर्भधारणा टाळणे हे मुख्य उद्देश आहेत असं सिरोना यांनी म्हटलं आहे. एआय आणि इंट्यूटिव्ह टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे फिचर बनवण्यात आले आहे.

Advertisement

हे फिचर व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेले आहे. फीचरचा उपयोग करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘9718866644’ हा नंबर सेव्ह करावा लागेल. सिरोनाच्या व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाउंटचा हा क्रमांक आहे. नंतर तुम्हाला या नंबरवर ‘हाय’ मेसेज करावा लागेल. ‘हाय’ केल्यानंतर तुमच्याकडे तीन पर्याय उपलब्ध होतील. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये ‘पीरियड ट्रॅकर’ टाइप करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या पीरियड्सचे तपशील टाकावे लागतील. यानंतर लगेचच तुम्हाला तुमची प्रजननक्षमता, पुढील आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखा आणि तुमच्या मासिक पाळीची लांबी याबद्दल सगळी माहिती मिळून जाईल.

 

Advertisement