SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सर्वसामान्यांना खिश्याला परवडणारे भारतातील 8 टॉप 5G स्मार्टफोन

सध्या पाहता भारतीय बाजारातील 5G स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला नेक्स्ट जेनरेशन टेक्नॉलॉजी असलेला फोन हवा आहे. परंतु सर्वच 5G स्मार्टफोन्स परवडणारे नाहीत. भारतात पुढील काही महिन्यातच 5जी सर्विस सुरू केली जाणार आहे. परंतु, स्मार्टफोन कंपन्यांनी त्याआधीच मार्केटमध्ये 5जी स्मार्टफोन लाँच केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन्सविषयी…

Realme 9 5G :-
Realme 9 5G स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 810 चिपसेटसह बाजारात आला आहे. यात 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आणि 18W फास्ट चार्जिंगसह मोठी मिळते. फोनमध्ये 48MP + 2MP आणि 2MP सेन्सर असलेला कॅमेरा सेटअप मिळतो. ड्युअल सिम 5G सपोर्टसह येणारा Realme 9 5G तुम्ही 14,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

iQOO Z6 :-
iQOO Z6 नुकताच लाँच झाला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC मिळते, जी बिल्ट-इन 5G मॉडेमसह येते. सोबत 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा फोन 14,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत विकत घेता येईल.

Vivo T1 5G :-
या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 695 SoC दिले जात असून या फोनला 5 जी सपोर्ट देखील दिला आहे. याशिवाय, विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट 6.58-इंच IPS डिसप्ले, 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा, 16MP सेल्फी कॅमेरा, 128GB ऑनबोर्ड स्टोरेज आणि18W फास्ट चार्जिंग सोबत 5,000mAh battery दिली आहे. या फोनची किंमत 15 हजार 990 रुपये असण्याची शक्यता आहे.

Realme 9 Pro :-
Realme 9 Pro मध्ये 64MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सोबत स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होते.

POCO M4 Pro 5G :-
POCO M4 Pro 5G मध्ये देखील मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेट मिळतो. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल मेमोरी देण्यात आली आहे. फोनच्या मागे 50MP + 8MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 6.6 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला एलसीडी डिस्प्ले मिळतो. 5000mAh ची बॅटरी असलेल्या या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे.

Moto G71 5G :-
Moto G71 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट, 16MP सेल्फी कॅमेरा, 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल कॅमेरा, 5,000mAh ची बॅटरी आणि IP52 रेटिंग मिळते. Moto G71 5G स्मार्टफोन भारतात 18,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.

Realme 9 5G SE :-
Realme 9 5G SE मध्ये स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट, 90Hz रिफ्रेश रेट, मोठी मोठी बॅटरी 48MP + 2MP आणि 2MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. कंपनीनं Realme 9 5G SE ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु केली आहे.

Samsung Galaxy F23 5G
रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Samsung Galaxy F23 भारतात आला आहे. या Snapdragon 750G SoC 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा-सेटअप मिळतो. Samsung Galaxy F23 5G ची किंमत Rs 19,999 रुपयांपासून सुरु होते.

Advertisement