SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईल स्क्रीनवर स्क्रॅच पडले? मग घरच्या घरी करा ‘हे’ उपाय..

स्मार्टफोन घेतला की आपण तो कसा वापरतो यावर तो किती वर्षे चांगल्या कंडिशनमध्ये राहील, हे समजुन जाते. नवीन घेतलेला फोन काही दिवस उलटल्यावर फोन जुना दिसू लागतो. आपण फोनचा कसाही वापर करतो किंवा आपल्याकडून तो कुठेही पडतो, हातामधून सटकला की जमिनीवर पडतो. अशा अनेक कारणांनी आपल्या फोनवर स्क्रॅच (Smartphone Scratch remove tips) पडतात.

अशा वेळेस जर तुम्ही चांगल्या प्रतिचा स्क्रीनगार्ड वापरत असाल तर स्क्रॅच पडले की मोबाईलवरून तो काढून टाकावा लागेल किंवा कमी स्क्रॅच असतील तर चेक करून वापरता येत असेल तर तात्पुरता मोबाईल वापरून घ्या. याशिवाय जर बॅक कव्हरचा वापर करत असाल तर बॅक पॅनेल सुरक्षित राहतो. परंतु, स्क्रीनवर मात्र स्क्रॅच पडतात. तुमच्या फोनच्या स्क्रीनवर देखील स्क्रॅच पडले असल्यास ते कसे घालवू शकता, ते वाचा…

Advertisement

बेकिंग सोडा: आपल्या घरात एक वस्तू अशी आहे जी नक्कीच उपलब्ध असते किंवा शॉपमध्ये जाऊन तुम्ही पाच रुपयांचा बेकिंग सोडा आणून स्क्रीनवरील स्क्रॅच घालवण्यासाठी उपयोगी येईल. आता काय करायचं तर तुम्ही एका वाटीत बेकिंग सोडा घ्या व त्यात थोडे पाणी टाका. मग पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट थोडी पातळ करा. या पेस्टला मऊ कापड अथवा कापसावर घेऊन स्क्रॅचवर हलक्या हाताने फिरवा. काही वेळातच फोनवरील स्क्रॅच नाहीसे झाल्याचं किंवा कमी झाल्याचे तुम्हाला दिसेल.

टूथपेस्ट: घरात आपण जी टूथपेस्ट वापरतो त्याचा उपयोग आपण दररोज दात स्वच्छ ठेवण्यासाठी करतोच पण फोनच्या स्क्रीनवरील स्क्रॅच काढण्यासाठीसुद्धा करा. फक्त तुम्हाला स्पीकर्सची काळजी घ्यावी लागेल. स्क्रीन साफ करण्यासाठी सर्वात प्रथम कापूस अथवा मऊ कापडावर थोडे टूथपेस्ट घ्या. त्यानंतर ते कापड स्क्रीनवर हलक्या हाताने हळूवार फिरवा. काही वेळातच तुम्हाला स्क्रीनवरील स्क्रॅच कमी झाल्याचे दिसेल. आता स्वच्छ कापडाना टूथपेस्टचे डाग पुसून टाका. मात्र, यावेळी जेलच्या टूथपेस्टचा वापर करू नका. फोनच्या स्क्रीनवर गार्ड असेल तर ही पद्धत अजून सोपी जाईल.

Advertisement

बेबी पावडर: आपल्या घरात किंवा शेजारीपाजारी कुठे ना कुठे तुम्हाला ही गोष्ट फुकट मिळेल ती म्हणजे बेबी पावडर. स्क्रॅच नाहीसे करण्यासाठी तुम्हाला आधी पाण्यात बेबी पावडर टाकून त्याची पेस्ट तयार करावी लागेल. या पेस्टला गोलाकार मोशनमध्ये स्क्रॅचवर लावा. आता काही वेळातच तुम्हाला स्क्रॅच कमी होतील दिसतील. असे काही जुगाड तुम्हाला उपयोगी येऊ शकतात. फक्त हे करण्यापूर्वी एकदा अवश्य खात्री करा की आपला फोन खराब नाही व्हायला हवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement