SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फोन स्लो झालाय! जाणून घ्या कारणं आणि करा फोनचा स्पीड आधी सारखा!

अनेक जणांचे अशी तक्रार असते की मोबाईल सतत स्लो होतो. अनेकदा आपण आपले डिवाइस वापरत असताना हँग होते असे पाहिले असेल. यामागे बरीच कारणे असतात. जर या समस्येवर व्यवस्थित उपाय झाला तर तुमच्या डिवाइसचा गेलेला स्पीड आपण परत मिळवू शकतो.

मेमरी

Advertisement

डिव्हाईस मेमरी फुल झाली असेल तर तुम्हाला नको असलेले व्हिडिओज, फोटोज या गोष्टी डिलीट करून ती मेमरी परत रिस्टोर करता येते. याचबरोबर अनेकदा आपल्याला नको असलेले ॲप सुद्धा आपण फोन मध्ये ठेवतो. त्यामुळे देखील डिवाइस ची मेमरी फुल होते आणि मोबाईल हँग होतो.

अनवांटेड ऑटो डाउनलोड

Advertisement

व्हाट्सअप, फेसबुक सारखे ॲप तुमच्या फोनमध्ये असतील तर या डिवाइस वरून ऑटो डाऊनलोड होण्याची सेटिंग तुम्हाला बदलून घ्यावी लागेल. येणारी प्रत्येक गोष्ट डाऊनलोड झाली तरी देखील डिवाइस मध्ये मेमरी फुल होण्याचा संभव असतो.

कॅशे डेटा

Advertisement

मोबाईलमध्ये असणारा डेटा क्लियर केला नाही तरीदेखील हँग होण्याची समस्या निर्माण होते. इंटरनेटवर ब्राउजिंग करत असताना तुमची ब्राउझिंग हिस्टरी म्हणजेच ब्राउझिंग डेटा यामध्ये जाऊन पडतो. जर तुम्ही कॅशे मेमरी डिलीट केले नाही तरी देखील मोबाइलला त्याचा भार सहन होत नाही आणि डिवाइस हँग व्हायला लागतो.

जास्तीचे पण कमी वापरातील अँप

Advertisement

अनेकदा आपण बरीच ॲप्स डाऊनलोड करून ठेवतो पण त्याचा फार क्वचितच उपयोग करतो. आपल्या मोबाईल वरती असे ॲप्स डाऊनलोड झाल्याने मोबाईलची मेमरी स्पेस ॲपमुळे कमी होते. अशामध्ये तुम्ही नको असलेले ॲप्स डिलीट तरी करायला हवेत. असे केले नाही तर मोठ्या अँप्सने मोबाईलची रॅम फुल होते.

Advertisement