SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

OLA बंद करणार ‘या’ दोन लोकप्रिय सेवा; electric car सेगमेंटच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

मुंबई :

मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कुटर, कार बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा वाढलेली दिसत आहे. यामध्ये ओला कंपनीच्या स्कुटर या सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ओला कंपनीला आपली एक सेवा बंद करावी लागत आहे. Ola ने घोषणा केली आहे की, कंपनी आता Quick Commerce व्यवसाय आणि Ola Dash Used Cars सेवा पूर्णपणे बंद करत आहे.

Advertisement

ओला कंपनीने हा व्यवसाय साधारणतः एक वर्षांपूर्वी सुरु केला होता. या संदर्भात ओला कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कंपनीने प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन केले आणि विचार केल्यानंतर ओला डॅश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या कार व्यवसायाला एक नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्नशील असून आपली गो-टू मार्केटिंग धोरण मजबूत करण्यावर सध्या लक्ष देत आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सर्व्हिस नेटवर्क आणि इलेक्ट्रिक विक्री लक्षात घेऊन ओलाच्या कारची पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यावर काम सुरु आहे. ओला इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये तिच्या कमाईचा 50% भाग घेते. ही आकडेवारी इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या बाबतीत मोठी आहे.

Advertisement

ओला कंपनीने एप्रिल ते मे 2022 दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीमध्ये एकूण 500 कोटींचा असा भक्कम महसूल मिळवला आहे. सध्या ओला कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस हा महसूल एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 7834 कोटींचा महसूल मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 15 ऑगस्ट रोजी कंपनी मोठा धमाका करणार असून इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये एंट्री करेल.

Advertisement