SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता घरबसल्या भरा Income Tax Return; जाणून घ्या प्रोसेस एका क्लिकवर

इन्कम टॅक्स अर्थात आयकर, म्हणजेच आपल्या उत्पन्नावरील कर. दरवर्षी आपल्या उत्पन्नाचा एक निश्चित भाग केंद्र सरकारला द्यावा लागतो, यालाच ‘आयकर’ भरणे म्हणतात. उद्योजक, व्यावसायिकांना दरवर्षी स्वतंत्र ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ (Income Tax Return) भरावा लागतो, तर नोकरदारांच्या वेतनातून ‘आयकरा’ची रक्कम कापली जाते.

मात्र, आता तुम्ही घरबसल्या-बसल्या देखील मोबाईल किंवा कॉम्पुटरच्या माध्यमातून आयटीआर फाइल करू शकता म्हणजे सहजपणे इन्कम टॅक्स भरू शकता. तुम्हाला फक्त तुमचे आधार, पॅन, बँक खाते क्रमांक, गुंतवणुकीचे तपशील आणि त्याचे पुरावे/प्रमाणपत्र, फॉर्म 16, फॉर्म 26AS यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. जाणून घेऊया या बाबतची सोपी पद्धत…

Advertisement

ITR भरण्याच्या सोपी पद्धत :-

▪️ तुम्ही प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/login जा
▪️ आता येथे तुम्ही तुमचा लॉगिन आयडी टाका आणि पासवर्ड टाका.
▪️ जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल, तर Forget Password या पर्यायावर जाऊन नवीन पासवर्ड तयार करा.
▪️ आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
▪️ आता तुम्ही ई-फाईलचा पर्याय निवडा आणि तेथे आयकर भरण्याचा पर्याय निवडा.
▪️ त्यानंतर तुम्ही आर्थिक वर्ष निवडा.
▪️ आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाइन पर्याय निवडाल, त्यानंतर वैयक्तिक पर्याय निवडा.
▪️ आता तुम्हाला ITR-1 आणि ITR-4 असे दोन पर्याय दिसतील
▪️ तुम्ही पगारदार वर्ग असाल तर त्यात ITR-1 निवडा.
▪️ आता तुमच्या सिस्टमवर एक फॉर्म उघडेल, तो भरण्यासाठी 139(1) मूळ रिटर्न निवडा.
▪️ आता तुमच्या समोर एक फॉर्म येईल, जो नीट भरावा, यासोबतच तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहितीही भरावी लागेल.
▪️ तुम्ही फॉर्ममध्ये ऑफलाइनचा पर्याय निवडल्यास, फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला संलग्न फाइलचा पर्याय दिसेल.
▪️ फॉर्म भरल्यानंतर, तुम्ही ऑनलाइन पडताळणी निवडा, त्यानंतर तुमचा फॉर्म पूर्णपणे भरला जाईल.

Advertisement