SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज महाराष्ट्र कृषी दिन! जाणून घ्या या दिवसाचे महत्व आणि इतिहास

आज 1 जुलै अर्थातच महाराष्ट्र कृषी दिवस. आज संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून मानले जाते. कारण भारत अनेक उत्पादनांसाठी या राज्यावर अवलंबून आहे. गरिबी पावसाअभावी दुष्काळ, वाढती महागाई यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत असून, दरवर्षी अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषी दिवस एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो. जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्व व इतिहास थोडक्यात…

महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्त्व?

Advertisement

महाराष्ट्रात कृषी दिनाला विशेष महत्त्व आहे, कारण वसंतराव नाईक यांनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुमोल सेवा दिली. या दिवशी राज्यभरात अनेक उत्सवांचे आयोजन केले जाते. भारतीय टपाल विभागाने शेत, शेतकरी आणि शेतातील प्राणी या थीमवर अनेक टपाल तिकिटे जारी केली आहेत.

या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. कृषी दिन शेतक-यांच्या दुर्दशेबद्दल मदत आणि जागरुकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकतो.

Advertisement

कृषी दिनाचा नेमका इतिहास?

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र कृषी दिन किंवा महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. वसंतराव नाईकांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनकही म्हटले जाते.

Advertisement

त्यांच्या जन्मदिवस हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी झाला. 1963 ते 1975 या काळात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. जेव्हा पासुन वसंत नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासुन त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव योगदान दिले असे सांगितले जाते.

Advertisement