SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर, गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, महागाईत सामान्यांना दिलासा…!

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी समोर आली आहे.. दर महिन्याच्या एक तारखेला विविध बदल होत असतात… त्यानुसार, जुलैमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होणार असल्याचे बोलले जात होते.. मात्र, पेट्रोलियम कंपनी ‘इंडियन ऑईल’ने आजपासून (1 जुलै) एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG Cylinder Price) मोठी कपात केली आहे.

‘इंडियन ऑईल’कडून (Indian oil) सिलिंडरच्या दरात तब्बल 198 रुपयांची कपात करण्यात आलीय. अर्थात, त्याचा गृहिणींना कोणताही फायदा होणार नाही.. कारण, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दर कायम आहेत. केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही कपात करण्यात आलीय. त्यामुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

मे मध्ये वाढ, जूनमध्ये कपात..

इंडियन ऑइल कंपनीचा 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 2021 रुपयांना मिळणार आहे. याआधी 1 जून रोजीही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 135 रुपये कपात करण्यात आली होती. मे महिन्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात दोनदा दरवाढ केली होती. त्यात 7 मे रोजी 50 रुपये, तर 19 मे रोजी 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

Advertisement

प्रमुख शहरातील व्यावसायिक गॅसच्या किंमती

  • दिल्ली- 2219 ऐवजी 2021 रुपये.
  • कोलकाता- 2322 ऐवजी 2140 रुपये.
  • मुंबई- 2171.50 ऐवजी 1981 रुपये.
  • चेन्नई – 2373 ऐवजी 2181 रुपये

‘इंडियन ऑईल’ कंपनीने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करतानाच, नवे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी घरगुती गॅस सिलिंडरचे दर कायम असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे..

Advertisement

दरम्यान, गेल्या 1 जूनपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु, मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच जनतेला मोठा दिलासा देताना, उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलिंडरमागे 200 रुपयांची गॅस सबसिडी जाहीर केली होती. योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला 12 सिलिंडरवर ही सबसिडी मिळणार आहे…

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement