शिवसेनेतील बंडाळीमुळे अखेर 29 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.. मात्र, ठाकरे सरकार कोसळण्यापूर्वी राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते..
महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी.. अर्थात ‘टीईटी’साठी (TET Exam) अर्ज करणाऱ्या संरक्षण कर्मचारी व शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना पात्रता गुणांत 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. अर्थात, नव्याने सत्तेवर आलेले शिंदे सरकार या निर्णयाला पाठिंबा देणार का, असाही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे..
Signed off as School Education Minister, Maharashtra yesterday with these two decisions close to my heart…
1) Happiness curriculum will be introduced from this year for Std 1 to 8 in all government & aided Marathi medium schools. #mindfullness#happinesscurriculum
(1/2) pic.twitter.com/wV3XkRDo0eAdvertisement— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 30, 2022
गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, की “संरक्षण कर्मचारी व शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी ‘टीईटी’ पात्रता गुणांमध्ये 15 टक्के सवलत दिली जाईल. देशाचं रक्षण करणं हीच राष्ट्रसेवा आहे. जवान व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे..”
‘हॅपिनेस अभ्यासक्रम’बाबत..
‘टीईटी’ व्यतिरिक्त सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार, सर्व सरकारी व अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांसाठी ‘हॅपिनेस अभ्यासक्रम’ सुरू केला जाणार आहे.. विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसह सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय..
दरम्यान, पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, तसेच जिल्हा परिषद व स्थानिक सरकारी शाळांमधील सर्व मागासवर्गीय मुलांना राज्य सरकारतर्फे गणवेश दिले जातात. तसेच, या शाळांना पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 89.59 कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.