SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने महाग होणार, केंद्र सरकारचा ‘त्या’ शुल्काबाबत मोठा निर्णय..

गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत आहे. त्यातच आता केंद्रीय महसूल विभागाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार सोने (Gold) खरेदी करणं आता महागणार आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कामध्ये 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घातला आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयामुळे असा अंदाज बांधला जात आहे की, आजपासूनच सोन्याच्या किंमतीत पुढील काही दिवसांतच दोन हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. याबाबत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी माहिती दिली.

Advertisement

दरम्यान, देशात याआधी सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क होते आता त्यामध्ये 5 टक्क्यांची वाढ केली असता केंद्र सरकारने हे आयात शुल्क 12.5 टक्क्यांपर्यंत नेले आहे. आत्तापर्यंत सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्के होते, जे उपकर आणि इतर शुल्कांसह 10.75 टक्के होते, परंतु 5 टक्के वाढीसह ते आता 15.75 टक्के होईल.

देशातील केंद्र सरकारने आयातशुल्कात केलेल्या या वाढीमुळे सोन्यावरील आयात शुल्क 10.75% वरून 15.75% पर्यंत वाढले आहे. IBJA सचिव सुरेंद्र मेहता यांच्या माहीतीनुसार, सोन्यावर तीन प्रकारची ड्युटी असते. पहिला आधार शुल्क 7.5%, दुसरा कृषी उपकर 2.5%, तिसरा सामाजिक कल्याण उपकर 0.75% आहे. एकूण शुल्क 7.5% वरून 12.75% पर्यंत वाढले आहे. जर आपण उपकर एकत्र घेतले तर शुल्क 10.75% वरून 15.75% होऊ शकते. फ्युचर्स आणि रिटेलमध्ये सोन्याच्या किंमतीत सुमारे 2500 रुपयांची वाढ शक्य आहे.

Advertisement

आषाढ व श्रावण या दोन महिन्यांमध्ये ग्रामीण भागात सोन्याचे भाव लग्नसराई नसल्याने वाढत नाहीत असं लोकांना वाटतं, खरं तर हा एक गैरसमज आहे. कारण प्रत्यक्षात बाजारपेठेतील इतर घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, सोन्याची मागणी व आंतरराष्ट्रीय परिस्थिती यांवर हे भाव ठरतात. त्यानंतर सोन्याचे भाव वाढतात आणि घसरतात. चांदीच्या भावामध्ये कोणत्याही प्रकारची मोठी वाढ (Gold-Silver Price Today) होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement